केवळ नितीन गडकरींनी खरं बोलण्याची हिम्मत केली : राहुल गांधी
नितीन गडकरी राफेल, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा इतर मुद्द्यांवरही बोलतील अशी आशा राहुल गांधी यांनी व्यक्त केली. जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही, गडकरींच्या या वक्तव्याचा आधार घेत राहुल गांधींनी ट्वीटच्या केलं आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'हिम्मत' दाखवल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. नितीन गडकरी एकमेव भाजप नेते आहेत, ज्यांनी खरं बोलण्याची हिम्मत दाखवली आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
नितीन गडकरी राफेल, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा इतर मुद्द्यांवरही बोलतील अशी आशा राहुल गांधी यांनी व्यक्त केली. जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही, गडकरींच्या या वक्तव्याचा आधार घेत राहुल गांधींनी हे ट्वीट केलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "गडकरीजी अभिनंदन, भाजपमध्ये तुम्ही एकमेव नेते आहात ज्यांच्यामध्ये खरं बोलण्याची हिम्मत आहे. कुपया तुम्ही राफेल, अनिल अंबानी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि संस्थांची सध्याची स्थिती यावरही काहीतरी बोलावं."
नागपूर येथे अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं गडकरींनी पक्षाचं काम करण्यास उत्सुक असणाऱ्या कार्यकर्त्यांचे कान टोचले. गडकरी म्हणाले, "भारतीय जनता पक्षासाठी, देशासाठी आपलं आयुष्य देण्यास तयार असणारे खूप लोक आपल्याला भेटत असतात. त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं. जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही".
'आधी आपलं घर व्यवस्थित चालवा, मुलंबाळं सांभाळा आणि मग भाजपचं किंवा देशाचं काम करा', असा सल्ला गडकरींनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
संबंधित बातम्या
जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही : नितीन गडकरी
व्हिडीओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
