राहुल गांधींनी कम्युनिस्ट नेत्यांसोबतचे फोटो शेअर करताना म्हटलंय की, “मेंग शियांगफेंग यांच्या नेतृत्वाखाली सीपीसीचं प्रतिनिधीमंडळ, सीपीसी केंद्रीय समितीचे सदस्यांची भेट झाली. या भेटीत त्यांच्यासोबत विचारांची देवाण-घेवाण झाली.”
दरम्यान, गेल्यावर्षी जुलैमध्ये भारत आणि चीन दरम्यान डोकलाम मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच, दुसरीकडे राहुल गांधींनी चीनच्या राजदूतांची भेट घेतली होती. राहुल गांधींच्या या भेटीवर भाजपने जोरदार आक्षेप नोंदवला होता. भाजपने राहुल गांधींवर चिनी नेत्यांसोबत गुप्त बैठका घेण्याचा आरोप केला होता.
पण काँग्रेसने भाजपचे सर्व आरोप फोटाळून लावले होते. राहुल गांधींची चिनी राजदूतांशी भेट म्हणजे शिष्टाचार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं होतं. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या चिनी राजदूतांसोबतच्या भेटीत उद्योगपती रॉबर्ट वाड्रा आणि राहुल गांधींच्या बहीण प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या.