एक्स्प्लोर
विमानात सहप्रवाशाला सामान उचलण्यास मदत, राहुल गांधींचं कौतुक
सोशल मीडियावर राहुल गांधींचे काही फोटो व्हायरल होत असून, त्यात ते एका प्रवाशाला सामान ठेवण्यात मदत करताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : आपल्या विनम्र आणि मदत करणाऱ्या स्वभावामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता राहुल गांधी विमानात आपल्या सहप्रवाशांना मदत करताना दिसले.
सोशल मीडियावर राहुल गांधींचे काही फोटो व्हायरल होत असून, त्यात ते एका प्रवाशाला सामान ठेवण्यात मदत करताना दिसत आहेत.
मेघालयमध्ये पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मंगळवारी दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानातून रवाना झाले. या हवाई प्रवासादरम्यानचे काही फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत.
राहुल गांधी विमानात एका प्रवाशाला सामान ओव्हरहेड केबिनमध्ये ठेवण्यात मदत करताना दिसत आहेत. यावेळी विमानातील काही प्रवाशांनी राहुल गांधींसोबत फोटो काढून ते ट्विटरवर पोस्ट केले. राहुल गांधींच्या जॅकेटवरुन राजकारण, भाजपचे गंभीर आरोप ट्विटरवर राहुल गांधींच्या या कृत्याचं जोरदार कौतुक होत आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स त्यांना 'डाउन टू अर्थ', 'मॅन विद गोल्डन हार्ट' अशा उपमा देत आहेत. तर ही निवडणुकीआधी जनतेला भूरळ पाडण्याची खेळी असल्याचं काहींचं म्हणणं आहे.Congress President @OfficeOfRG helps co passengers a helping hand during his journey from Delhi to Guwahati enroute Shillong earlier today pic.twitter.com/J6hRsCJsrB
— Vinay Kumar Dokania (@vinaydokania) January 30, 2018
Look At His Background, May Be One Of The Most Highprofile, Powerful, Influential, Of India Yet He's A True Gentleman Down To Earth Person...... — Shahzad Khan (@SyuppyKhan) January 30, 2018
RG is always a common man, Keep it up... Under your leadership #Congbounceback
— Pravat Kumar Mahapatra. (@PravatMahapat) January 30, 2018
That's the difference between gentle RaGa and arrogant Saheb — MPMP (@vikas_dubey_mp) January 30, 2018
Shukra Hai hammare pass aisee leader..who is ground to Earth..and at least fekta to nahi Hai
— Sudhir Yadav (@sudhir_mit) January 31, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement