एक्स्प्लोर

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचं आज ऑनलाईन आंदोलन, सोनिया-राहुल गांधींसह 50 लाख कार्यकर्त्यांचा सहभाग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. मजूर, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांसाठी पॅकेजची मागणी करत काँग्रेस आज ऑनलाईन आंदोलन करणार आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोना (corona) संकट वाढच चाललं आहे. यातच देशातील राजकारण सुद्धा तापत असल्याचं चित्र आहे. केंद्रात 'मोदी सरकार 2.0' (Modi 2.0) च्या एक वर्षपूर्तीच्या मुहुर्तावर 30 मे रोजी भाजप 1000 व्हर्चुअल कॉन्फरंससह अनेक ई-रॅलींचे आयोजन करणार आहे. तर त्याआधीच काँग्रेसनं नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. मजूर, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांसाठी पॅकेजची मागणी करत काँग्रेस (Congress Online Protest) आज ऑनलाईन आंदोलन करणार आहे. लॉकडाऊनमुळं मजूर, शेतकरी आणि गरीब लोकांचे हाल होत आहेत. या घटकांना मदत देण्याची मागणी करत कॉंग्रेस मोदी सरकारविरोधात ई आंदोलन करणार आहे. जे लोक इन्कम टॅक्सच्या परिघाच्या बाहेर आहेत अशा लोकांच्या खात्यात केंद्र सरकारकडून 10 हजार रुपयांची मदत तात्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस आज आज 11 ते 2 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अभियान करणार आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनात फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफार्मवर एकत्रित 50 लाख कॉंग्रेस कार्यकर्ते ऑनलाईन आपली बाजू मांडणार आहेत, अशी माहिती आहे. ऑनलाईन अभियानाच्या माध्यमातून मजूर, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांसाठी काँग्रेसकडून मुद्दे मांडले जाणार आहेत. आपली मागणी घेऊन कॉंग्रेस मोठ्या प्रमाणात ट्रेंड करण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसनं म्हटलं आहे की, आम्ही संकटात सापडलेल्या लोकांसाठी मागणी करत आहोत. त्यासाठी हे आंदोलन आहे. केंद्र सरकारनं या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करावी आणि कॉंग्रेसनं केलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात. जे लोक इन्कम टॅक्सच्या परिघाच्या बाहेर आहेत अशा लोकांच्या खात्यात केंद्र सरकारकडून 10 हजार रुपयांची मदत तात्काळ देण्यात यावी, असं कॉंग्रेसनं पत्रकात म्हटलं आहे. ऑनलाईन आंदोलन करत असलेल्या काँग्रेसनं लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाचा चांगलाच उपयोग केला आहे. दोन वेळा काँग्रेस वर्किंग कमिटीची आणि एकदा विरोधी पक्षांची बैठक ऑनलाईन झाली आहे. राहुल गांधी यांनी या माध्यमातून तज्ञांशी देखील बातचीत केलीय. तसंच मजूरांशी केलेला संवाद देखील या प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता. राहुल गांधी यांवी आतापर्यंत चार वेळा ऑनलाईन प्रेस कॉन्फरंस केली आहे. प्रियंका गांधी देखील ऑनलाईन अॅक्टिव्ह असतात. काही दिवसांपूर्वी योगी सरकारविरोधात यूपीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऑनलाईन आंदोलन केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Election : सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा पराभव
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पराभव
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
Embed widget