एक्स्प्लोर
पुरामुळे गुजरातचं जनजीवन विस्कळीत, मात्र काँग्रेसचे 42 आमदार बंगळुरुत
गुजरातमध्ये काँग्रेसच्या 57 आमदारांपैकी 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर पक्षाचे वरिष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे.
अहमदाबाद : पूर आणि मुसळधार पावसाने गुजरातमध्ये आतापर्यंत 136 जणांचा जीव घेतला आहे. मात्र नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं असताना काँग्रेसचे 42 आमदार बंगळुरुतील एका रिसॉर्टमध्ये आहेत. त्यामुळे आपण निवडून दिलेला प्रतिनिधीच नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
गुजरातमध्ये काँग्रेसवर राजकीय संकट
गुजरातमध्ये काँग्रेसच्या 57 आमदारांपैकी 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर पक्षाचे वरिष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे.
उर्वरित आमदारांपैकी काही आमदार वाघेला गटाचे आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीपूर्वी आमदार फुटू नयेत, यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. 42 आमदारांना भाजपच्या भीतीने बंगळुरुला हलवण्यात आलं असून एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. राज्यसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा पराभव टाळण्यासाठी काँग्रेसला मोठी मेहनत घ्यावी लागत आहे.
काँग्रेसचे आणखी काही आमदार फुटणार?
काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता केवळ 51 आमदार उरले आहेत. त्यापैकी किती आमदार पक्षासोबत राहतील, याबाबत मोठी शंका आहे. कारण पक्षाला सध्या 44 आमदारांचाच पाठिंबा असल्याचं काँग्रेस नेते भरत सिंह सोलंकी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे आणखी काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देतील, असा अंदाज लावला जात आहे.
विजय रुपानींचा काँग्रेसवर हल्लाबोल
पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे, मात्र काँग्रेसल त्याचं काहीही देणं घेणं नाही, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केली आहे.
अहमद पटेल यांनी राज्यसभेत पराभव होऊ नये म्हणून आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. मात्र इकडे नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी काँग्रेसचा एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नाही, असा हल्लाबोल रुपानी यांनी केला.
गुजरात आणि राज्यसभेचं गणित
- 182 सदस्यसंख्येच्या गुजरात विधानसभेत भाजपचे 121 आमदार
- काँग्रेस आमदारांची संख्या 57
- मात्र शंकरसिंह वाघेलांसह 6 आमदारांनी सोडचिट्ठी दिल्याने काँग्रेसचं संख्याबळ 51 वर
- राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 47 मतं आवश्यक
- मात्र काँग्रेसच्या 51 पैकी वाघेला गटाचे अनेक आमदार आहेत
- त्यामुळे अहमद पटेल यांना 47 मतांसाठी मोठा संघर्ष करावा लागणार
- राष्ट्रपती निवडणुकीत 11 मतं फुटल्याने काँग्रेसला धास्ती
- राज्यसभेसाठी गुजरातमध्ये 8 ऑगस्टला मतदान
गुजरातमध्ये काँग्रेसला खिंडार, दोन दिवसांत 6 आमदारांचा राजीनामा
काँग्रेसच्या चाणक्याला हरवण्यासाठी भाजपचा सापळा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement