Rahul Gandhi on Election 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. या सर्व निवडणुकांचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस देखील आता सज्ज झाली आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींचं ट्वीट चर्चेत आहे. द्वेषाला हरवण्याची हीच योग्य वेळ, असं ट्वीट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलं आहे.
सर्वच पक्षांकडून विजयी होण्याचा सूर
दुसरीकडे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उत्तरप्रदेशात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. भाजपने पूर्ण बहुमतासह 300 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. त्याच वेळी, सपानं आयोगाकडे डिजिटल स्पेससाठी नियम बनवण्याची मागणी केली आहे. निष्पक्ष निवडणुकांचा विश्वास व्यक्त करत बसपानं कार्यकर्त्यांना आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष युवक, शेतकरी, महिला, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढण्याचा पुनरुच्चार केला आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाकडून निर्बंध लागू
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री आठ पासून सकाळी आठपर्यंत निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल.
कोणत्या राज्यात कधी मतदान?
उत्तर प्रदेश
पहिला टप्पा - 10 फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा - 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
तिसरा टप्पा - 20 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
चौथा टप्पा - 23 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
पाचवा टप्पा - 27फेब्रुवारी 2022
सहावा टप्पा - 3 मार्च 2022 रोजी मतदान
सातवा टप्पा - सात मार्च 2022 रोजी मतदान