ICMR on trial results of third dose of Covaxin : भारत बायोटेकने बूस्टर शॉट म्हणून कोविड-19 च्या 'कोव्हॅक्सिन' लसीच्या सुरक्षितता आणि रोगप्रतिकारकतेच्या चाचणीचे निकाल जाहीर केले. त्यानंतर आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) रविवारी (9 जानेवारी) एक ट्वीट शेअर केले.
त्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी कोवॅक्सिनच्या बूस्टर डोसची सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक शक्तीबद्दल खात्री देणारी विश्वसनीय माहिती आम्ही देत आहोत.' आयसीएमआर या ट्वीटमधून कोवॅक्सिनच्सा तिसऱ्या लसीबाबत माहिती दिली आहे.
ICMR चे ट्वीट
बूस्टर डोस कुणाला?
10 जानेवारीपासून भारतात कोरोनाचे ( corona) दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लशीचा बुस्टर डोस ( Booster shot) देण्यात येणार आहे.
बूस्टर डोस घेताना कोणती लस घ्यायची?
बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस देण्यात येईल तर ज्यांनी कोव्हिशील्ड लस घेतली आहे, अशांना कोव्हिशील्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha