Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी महागाईबाबत सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. सोमवारी मोदी सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, महागाईमुळे भारतातील लोकांना फरक पडत आहे, परंतु भाजपला त्याची पर्वा नाही. गेल्या काही महिन्यांत किराणा मालाच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा दावा करत राहुल गांधींनी ट्विट केले आहे. 


राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, 'भाजपवर नाही मात्र भारतातील जनतेवर याचा परिणाम होत आहे.' तसेच महागाई आणखी वाढेल, असा इशाराही राहुल गांधी यांनी शनिवारी दिला. यासोबतच देशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली. राहुल गांधी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वीच किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्ग भरडला गेला होता.




राहुल गांधी यांनी म्हटलंय की, 'कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरपेक्षा जास्त झाल्याने महागाई आणखी वाढेल, अन्नधान्याच्या किमती 22 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. कोरोनाने जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारत सरकारने योग्य पाऊले उचलून जनतेना महागाईपासून वाचवावे.'




 


सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कच्च्या तेलाच्या आणि खाद्येतर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्क्यांच्या आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. या काळात घाऊक किमतीवर आधारित महागाई 13.11 टक्क्यांवर पोहोचली. 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या वाढीचा घाऊक किंमत निर्देशांकावर विपरीत परिणाम झाला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha