Naxalite Attack in Chhattisgarh Sukma : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या नवीन पोलीस छावणीवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियनचे तीन जवान जखमी झाले असले तरी तिन्ही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी सुकमा एसपी सुनील शर्मा यांनी दावा केला आहे की, जवानांच्या प्रत्युत्तरात अनेक नक्षलवादी देखील जखमी झाले आहेत. असे सांगण्यात येत आहे की, नवीन कॅम्पमध्ये नक्षलवाद्यांनी UBGL सोबत हल्ला केला. तसेच ग्रेनेड लॉन्चर देखील केले, परंतु कोणतेही नुकसान झाले नाही. या पोलीस छावणीचे नुकतेच उद्घाटन करण्यात आल्याचे एसपी यांनी सांगितले.
चकमकीत नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस स्टेशन क्षेत्रातील एलमागुंडा येथे उपस्थित असलेल्या सीआरपीएफच्या नवीन छावणीवर गोळीबार केला. एलमागुंडा येथे उघडण्यात आलेले सीआरपीएफ द्वितीय बटालियनचे हे नवीन कॅम्प चिंतागुफापासून 12 किलोमीटर अंतरावर आणि मीनपापासून सुमारे 5 किमी अंतरावर हे कॅम्प आहे. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांनी या नवीन छावणीला लक्ष्य केले आणि येथे जवानांवर गोळीबार केला.
चकमकीत तीन जवान जखमी
जवानांनी तत्काळ नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले आणि यादरम्यान सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले. जखमींमध्ये हेड कॉन्स्टेबल हेमंत चौधरी, कॉन्स्टेबल बसप्पा आणि कॉन्स्टेबल ललित बाग यांचा समावेश असून, जखमी जवानांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवानांचे प्राण धोक्याबाहेर आहेत. चकमकीनंतर नक्षलवादी घटनास्थळावरून पळून गेले, तर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा एसपींनी केला आहे आणि झडतीदरम्यान घटनास्थळी रक्ताचे डागही दिसले आहेत.
साथीदारांचा बदला घेण्यासाठी आले होते नक्षलवादी
मीनपा येथे 2020 मध्ये 21 मार्च रोजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती आणि या चकमकीत 23 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या चकमकीत 17 जवान शहीद झाले होते, त्यासोबतच नक्षलवाद्यांनी एक प्रेस नोट जारी करून जवानांच्या मृत्यूची माहिती दिली होती. नक्षलवाद्यांनी आपल्या साथीदारांचा बदला घेण्यासाठी 21 मार्च रोजी पोलीस छावणीला लक्ष्य केले, परंतु त्यांची योजना यशस्वी होऊ शकली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये प्राण गमावलेल्या विद्यार्थ्याचे पार्थिव कर्नाटकात दाखल, मुख्यमंत्री बोम्मईंनी वाहिली श्रद्धांजली
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
- Uttarakhand CM : कोण होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री? राजनाथ सिंह करणार नावाची घोषणा, धामीसह हे दिग्गज नेते शर्यतीत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA