भोपाळ: 'ये इंडिया है, यहा कुछ भी हो सकता है' असं म्हटलं जातंय. इथं प्रत्येक गोष्टीला जुगाड वापरला जातोय. असाच काहीसा जुगाड भोपाळच्या डॉक्टरांनी केला. चार वर्षाच्या हृदयाचं ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांना लक्षात आलं की ऑपरेशनचं एक डिव्हाईस त्या मुलीच्या हृदयातच राहिलं. मग त्या डॉक्टरांनी त्यावर ओपन हर्ट सर्जरी न करता केवळ तारेच्या सहाय्याने ते डिव्हाईस बाहेर काढलं. ही बातमी आता चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
भोपाळमध्ये एका हॉस्पिटलमध्ये चार वर्षाच्या मुलीच्या हृदयाचं ऑपरेशन करण्यात आलं. या मुलीच्या हृदयामध्ये असलेलं छिद्र बंद करण्यासाठी व्हीडीएस डिव्हाईसचा वापर करण्यात आहे. पण ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांच्या लक्षात आलं की हे डिव्हाईस हे त्या मुलीच्या हृदयातच राहिलं. अशा वेळी एकमात्र उपाय असतो तो म्हणजे ओपन हर्ट सर्जरी. पण त्या मुलीचं वय हे केवळ चार वर्ष असल्याने ओपन हर्ट सर्जरी करण्यापेक्षा दुर्बिनच्या सहाय्याने ते काढायचं ठरलं.
मग या डॉक्टरांनी त्या मुलीच्या घरच्यांशी चर्चा केली आणि दुर्बिनीच्या सहाय्यानेच हे डिव्हाईस बाहेर काढण्याचं ठरवलं. मग एका तारेच्या सहाय्याने ते डिव्हाईस हृदयातून बाहेर काढण्यात आलं. ही गोष्ट जरा अशक्य वाटत असली तरी डॉक्टरांनी ती करुन दाखवली.
भोपाळमधील एका खासगी रुग्णालयातील हा किस्सा आहे. या चार वर्षाच्या मुलीचं नाव हे आराध्या असं असून सध्या तिची प्रकृती ठणठणीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
संबधित बातम्या:
- Swami Sivananda : देशाला भावूक करणारा प्रसंग, 125 वर्षाच्या या 'योग सेवका'ला पद्मश्री देण्यासाठी स्वत: राष्ट्रपतींनी खुर्ची सोडली
- #DIDLilMasters : तळकोकणातील विघ्नेश साळुंखे आणि त्याच्या उंदीर मामानं केलाय कल्ला! ‘डान्स इंडिया डान्स’च्या मंचावर जोडीची चर्चा
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क