अमेठीमधील रोड शोनंतर राहुल गांधी पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट पडलेला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याबद्दल काँग्रेस नेते अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून भीती व्यक्त केली आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.
VIDEO | अमेठीतील रॅलीदरम्यान राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लेजर लाईट? | अमेठी | एबीपी माझा
'भारताचे दोन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबत घातपात झाला होता. 1991 साली लोकसभा निवडणुकांच्या काळातच राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती.' असा उल्लेखही पत्रात आहे.
राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर किमान सातवेळा ग्रीन लेझर लाईट मारण्यात आल्याचं पत्रात म्हटलं आहे. पुरावा म्हणून काँग्रेसने संबंधित व्हिडिओही सोबत जोडला आहे.
दरम्यान, लेझरऐवजी उन्हामुळे माईक-कॅमेराचं परावर्तन झाल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे लवकरच समोर येईल.