अनंतपूर(आंध्रप्रदेश) : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज देशभरात मोठ्या उत्साहात सुरवात झालेली असताना मात्र आंध्रप्रदेशात विधानसभा उमेदवाराने ईव्हीएम मशीन जमीनीवर आदळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून त्या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे.


आंध्रप्रदेशात आज लोकसभेच्या 25 आणि विधानसभेच्या 175 जागांसाठी मतदान होत आहे. आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील जन सेना पक्षाचे उमेदवार मधुसुदन गुप्ता यांनी गुटी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन जमीनीवर आदळलं.  मतदान कक्षामध्ये लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची नावं योग्यप्रकारे दर्शवण्यात आली नसल्याचा आरोप गुप्ता यांनी केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र राग अनावर झालेल्या गुप्ता यांनी जवळच असलेले ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळलं.  या घटनेनंतर मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मतदान केंद्रावर माध्यमांशी बोलताना मधुसुदन यांनी अचानक ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आदळल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी मधुसुदन गुप्ता यांना अटक केली आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज देशभरातील 91 मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रातही 7 मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

व्हिडीओ :



संबंधित बातम्या :

विदर्भात पहिल्या दोन तासातील मतदानाची आकडेवारी


विदर्भातील रंगतदार लढती, पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांचा आढावा


देशातील 'या' दिग्गजांचं भविष्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार