Soniya Gandhi News : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या बंगल्यासोबतच काँग्रेस नेत्यांच्या 3 सरकारी घरांवरील तब्बल 18 लाख भाडे थकीत असल्याचे एका आरटीआयच्या माहितीतून (RTI) समोर आले आहे. यानंतर काँग्रेस नेत्यांना लाजवेल असे कृत्य आता भाजपकडून करण्यात येणार आहे. कॉंग्रेस नेत्यांचे थकित भाडे भरण्यासाठी भाजपने देणग्या गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे. हे अभियान भाजप नेते तेजिंदर सिंग बग्गा यांनी सुरू केले आहे.
कोणत्या निवासस्थानावर किती देणं बाकी आहे?
गुजरातच्या सुजित पटेल यांनी आरटीआय (RTI) दाखल करून केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला याबाबत विचारणा केली, काँग्रेस नेत्यांकडे सरकारी निवासस्थानासाठी किती भाडे थकित आहे? 26 अकबर रोडचे 12 लाखांहून अधिक भाडे, तर सोनिया गांधींचे अधिकृत निवासस्थान 10 जनपथचे 4 हजार, तसेच अजयच्या चाणक्यपुरी, दिल्ली येथील निवासस्थानाचे 5 लाखांहून अधिक भाडे थकीत असल्याचे आरटीआयमध्ये उघड झाले आहे.
भाजप देणग्या गोळा करून सोनिया गांधींना पाठवणार
काँग्रेस नेत्यांना लाजवेल अशी देणगी गोळा करून भाडे भरण्याची मोहीम भाजपने सुरू केली आहे. भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी म्हटलंय की, जेव्हा भाड्याएवढी देणगी जमा होईल, तेव्हा हे भाडे सोनिया गांधींना पाठवले जाईल. तेजेंद्र बग्गा यांनी आज सोशल मीडियावर ही मोहीम सुरू केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Hijab Controversy: RSS च्या मुस्लिम आघाडीकडून कर्नाटकमधील 'त्या' मुलीचे कौतुक म्हणाले..,
- महाराष्ट्र मास्क मुक्त कधी होणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha