Kerala Gold Smuggling Case: केरळमधील बहुचर्चित सोने तस्करी प्रकरणातील  मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश या महिलेला केरळ उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. केरळ हायकोर्टानं स्वप्ना सुरेशला जामीन मंजूर केला आहे.  सोने तस्करी प्रकरणात एनआयए (NIA)ने  UAPA अंतर्गत स्वप्ना सुरेश विरोधात गुन्हा दाखल केला होता.  


या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती सी जयचंद्रन यांच्या खंडपीठाने मंगळवारी निर्णय दिला की, सोन्याच्या तस्करीने देशाच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, परंतु 'दहशतवादी कृत्य' या कायद्याच्या तरतुदींमध्ये ते समाविष्ट नाही. 2020 साली खूप गाजलेल्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश आणि इतर सात जणांना कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. 



25 लाख रुपयांच्या जामिनावर सुटका


केरळ हायकोर्टानं मुख्य आरोपी स्वप्ना सुरेशला  25 लाख रुपयांच्या जमानत बांड आणि दो सॉल्वेंट (solvent sureties) वर आरोपी स्वप्नाला जामीन मंजूर केला. NIA नं जामिनासाठीची याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टानं आरोपींना जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे.  


सासऱ्याच्या संपत्तीमध्ये जावयाचा कोणताही अधिकार नाही, केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय


तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तब्बल 15 कोटींचं सोनं केलं होतं जप्त  


सोन्याच्या तस्करीचं हे मोठं प्रकरण मागील वर्षी समोर आलं होतं.  तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तब्बल 15 कोटींचं सोनं  जप्त  केलं होतं. संयुक्त अरब अमीरात (यूएई)च्या वाणिज्य दूतावासाच्या राजनयिक सामानातून 15 कोटीचं सोनं जप्त केलं होतं.  सीमा शुल्क विभागाच्या  अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयएनं एक गुन्हा दाखल केला होता. एआयएनं यूएपीएअंतर्गत हा गुन्हा दाखल केला होता.  


पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणं म्हणजे वैवाहिक बलात्कार, घटस्फोटासाठी ठोस कारण ठरेल; केरळ उच्च न्यायालय