मुंबई : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) सोमवारी 22 जानेवारी रोजी मेघालयात (Meghalaya) पोहोचली. खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातून मेघालयात दाखल झाली. राज्याच्या सीमेवर प्रवेश केल्यानंतर लगेचच खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या अनेक नेत्यांनी री भोई जिल्ह्यातील नोंगपोह येथे पदयात्रेत भाग घेतला.


री भोई जिल्ह्यातील बर्निहाट येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा टप्पा असणार आहे. तसेच इथे नॉन्गपोहमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या एका बैठकीला देखील राहुल गांधी हे हजर राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. दरम्यान मेघालयमधून ही यात्रा पुन्हा एकदा आसाममध्ये जाणार आहे. तसेच मंगळावर 23 जानेवारी रोजी सकाळी आसाम -मेघालयच्या सीमेवर तरुणांशी राहुल गांधी हे चर्चा करणार आहेत. 






केंद्र सरकारवर हल्लाबोल


मेघालयातील जनतेशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी म्हटलं की, खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालय सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले होते. मेघालय सरकारला सर्वात भ्रष्ट म्हटल्यावर लगेचच त्यांनी इथल्या सरकारसोबत युती देखील केली. तुमच्या भाषा आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नाहीत. तुमची जमीन, आदिवासी, स्थानिक लोक आणि जंगले यांचे संरक्षण करणाऱ्या वास्तू उखडून टाकल्या आहेत.


मी दिल्लीतील तुमचा पाईक - राहुल गांधी


मी दिल्लीत तुमचा शिपाई आहे. तुम्हाला माझ्याकडून जे काही लागेल, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन. आम्ही कधीही तुमच्या इतिहास, परंपरा, भाषा, धर्म किंवा जीवनशैली कोणालाही इजा होऊ देणार नाही. भाजप आणि आरएसएस आपल्या देशाच्या पायावर आघात करत होते. भारताच्या कल्पनेचे रक्षण करण्यासाठी आम्ही समुद्रातून काश्मीरच्या पर्वतापर्यंत चालत गेलो. आम्ही शेतकरी, मजूर आणि तरुणांचा आवाज ऐकला, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान राहुल गांधींची न्याय यात्रा ही सध्या आसाममधून मेघालय इथे आली असली तरीही ही यात्रा पुन्हा एकदा आसाममध्ये जाणार आहे. तसेच आसाम आणि मेघालयाच्या सीमेवर ते तरुणांशी देखील संवाद साधतील. 


हेही वाचा : 


Ayodhya : अयोध्येच्या राम मंदिरामुळे पर्यटक वाढणार आणि यूपीची तिजोरी भरणार, राज्याच्या महसुलात 25 हजार कोटींच्या वाढीची शक्यता