एक्स्प्लोर

यूपीत पुन्हा 'यादवी', सपा आज फुटणार?

नवी दिल्ली: गेल्या दीड महिन्यांपासून उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि मुलगा अखिलेश यादव यांच्यात सुरु असलेली लढाई निर्णायक टप्प्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर यूपीत मुलायमसिंहांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्याचवेळी देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची सत्ता सांभाळणाऱ्या यादव कुटुंबात अंतर्गत कलहाची नांदी सुरु झाली आहे. एका बाजूला 42 वर्षाचा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला त्याचा सख्खा बाप, काका आणि इतर काही बाहेरचे कळलावे नारद. अखिलेश यादव स्वतःला मुलायम सिंह यांचे राजकीय वारसदार मानतात. त्यामुळेच त्यांनी काल मुलायम सिंह यांना विश्वासात न घेता काका शिवपाल यादवांसह इतर ३ मंत्र्यांची पुन्हा हकालपट्टी केली. यूपीत पुन्हा 'यादवी', सपा आज फुटणार? यानंतर मुलायम सिंहदेखील आक्रमक झाले. त्यांनीही काही तासातच अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुलायमसिंहांचे चुलतबंधू रामगोपाल यादव यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे या वादाने टोक गाठलं आहे. नेमका वाद काय? निवडणुकांच्या तोंडावर जो कोणी पक्षात येईल, त्याला प्रवेश द्यायचा हा शिवपाल यादव यांचा निर्णय. मात्र त्याला मुख्यमंत्री आणि पुतण्या अखिलेश यांचा विरोध होता. त्यातच सप्टेंबर महिन्यात गायत्री प्रजापती, राजकिशोर सिंह या दोन मंत्र्यांना पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरुन अखिलेशनं मंत्रिमंडळातून हाकललं. हे दोन्हीही मंत्री शिवपाल यांच्या जवळचे. त्यानंतर शिवपाल यादव यांची सगळी महत्वाची खाती काढून घेतली. या कृतीनं दोघांमधली दरी चांगलीच रुंदावली. हा सर्व वाद दीड महिन्यापूर्वीचा होता. त्यानंतर स्वत: नेताजींनी म्हणजेच मुलायम सिंहांनी हा वाद मिटवला होता. शिवपाल परत मंत्रिमंडळात आले होते. पुन्हा वाद उफाळला शिवपाल यादव हे मुलायमसिंहांचे लहान बंधू. तेच त्यांच्या जास्त जवळचे आहेत. त्यामुळेच शिवपाल यांनी मंत्रिमंडळात परतल्यानंतर अखिलेश समर्थकांवर धडाधड वार करण्यास सुरुवात केली. अखेरीस या सगळ्याचा स्फोट झाला. अखिलेशनं दीड महिन्याच्या काळात पुन्हा एकदा आपल्या काकाला हिसका दाखवला. थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन. म्हणजे ज्या शिवपाल यांच्याकडे सिंचन, पीडब्लूडी, महसूल यासह सहा महत्वाची खाती होती ते एका झटक्यात मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेत. अर्थात या चालीला उत्तर द्यायला मुलायम यांना दोन तासही लागले नाहीत. त्यांनी तातडीनं अखिलेशचे गुरु मानले जाणारे रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं. वर त्यांच्यावर भाजपशी साटंलोटं करुन पक्षाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही केला. कोण कुणाच्या बाजूने?
मुलायम सिंह अखिलेश यादव
शिवपाल यादव (सख्खाभाऊ) पत्नी डिंपल यादव
मुलायम सिंहांची पत्नी साधना रामगोपाल यादव (मुलायम सिंहांचे
मुलगा प्रतिक यादव अक्षय यादव (रामगोपाल यांचे पुत्र)
शिवपाल यांचा मुलगा आदित्य  
  संबंधित बातम्या उत्तर प्रदेशमध्ये शिवपाल यादवांसहित चार मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी यादव कुटुंबात महाभारत, नेमका वाद काय?

महत्त्वाच्या बातम्या

तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
China Border Tension : भारताचे इंटेलिजन्स समजून घ्यायचे असेल तर 'धुरंधर' सिनेमा पाहा; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला, शशी थरूर म्हणाले...
भारताचे इंटेलिजन्स समजून घ्यायचे असेल तर 'धुरंधर' सिनेमा पाहा; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला, शशी थरूर म्हणाले...
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
एल निनोचा जगावर परिणाम, तापमानात मोठी वाढ, पुढील सहा महिन्यात 55 हजार मृत्यू होण्याची शक्यता, धक्कादायक माहिती समोर
एल निनोचा जगावर परिणाम, तापमानात मोठी वाढ, पुढील सहा महिन्यात 55 हजार मृत्यू होण्याची शक्यता, धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget