एक्स्प्लोर

Cocaine Seized : गुजरातमधील मुंद्रा बंदरावर तब्बल 500 कोटींचे कोकेन जप्त, डीआरआयची कारवाई 

Cocaine Seized : DRI अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात DRI ने देशभरातून 321 किलो कोकेन जप्त केले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 3200 कोटी रुपये आहे

Cocaine Seized :  गुजरातमधील मुंद्रा बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)  52 किलो कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या औषधांची किंमत तब्बल 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कोकेनची ही खेप इराणमार्गे गुजरातमधील मुंद्रा विमानतळावर पाठवण्यात आली होती. 2021-22 या वर्षात महसूल गुप्तचर संचालनालयाने आतापर्यंत 3200 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, अमली पदार्थांची मोठी खेप इराणमार्गे भारतात पाठवली जाऊ शकते अशी माहीती गुप्तचर संचालनालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरआयने गुप्त कारवाई सुरू केली. या कारवाईला ऑपरेशन नमकीन असे नाव देण्यात आले होते. ऑपरेशनमध्ये मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे DRI ला 25 मेट्रिक टन मिठाच्या खेपाचा संशय आला होता. ही खेप गुजरातमधील मुंद्रा बंदरात आली होती. या मिठाच्या खेपेत मुंद्रा बंदरात इराणमधून आयात करण्यात आलेल्या 1000 गोण्यांचा समावेश होता. 

संशयाच्या आधारावर 24 मे ते 26 मे 2022 पर्यंत डीआरआय अधिकाऱ्यांनी एका शेताची तपासणी केली. या तपासणीत मिठाच्या काही गोण्या संशयास्पद आढळून आल्या. डीआरआय अधिकार्‍यांनी या संशयित बँगांमधील नमुन्यांची गुजरातच्या फॉरेन्सिक सायन्स संचालनालयाच्या प्रयोगशाळेत चाचणी केली.

प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चाचणीत या पिशव्यांमध्ये कोकेन आढळून आले. त्यानंतर आतापर्यंत झडतीदरम्यान 52 किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. कोकेन जप्त केल्यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांनी एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदींनुसार तपास आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे. तसेच ही खेप कोणत्या कंपनीने मागवली होती आणि ती कुठे जाणार होती? याचाही सखोल तपास सुरू आहे. याआधीही मुंद्रा बंदरात इराणमार्गे अमली पदार्थांची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे.

DRI अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात DRI ने देशभरातून 321 किलो कोकेन जप्त केले होते, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 3200 कोटी रुपये आहे. गेल्या काही महिन्यांत डीआरआयने अंमली पदार्थांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची नोंद केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget