सोलापूर : भारत (India) हा धर्म प्रधान देश आहे, येथे सर्व गोष्टींची पूजा केली जाते. भारतात विशेषत: हिंदू नद्या, पर्वत, झाडं, ग्रह, प्राणी अशा सर्व गोष्टींची पूजा केली जाते. जगातील सर्वात धोकादायक आणि विषारी सापांपैकी एक असलेल्या कोबराचीही या देशात पूजा केली जाते. पूजा वैगेरे करण्यापर्यंत ठीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रात (Maharashtra) एक असं गाव आहे, जिथे प्रत्येक घरात साप (Snake) पाळले जातात. जसं सामान्य लोक घरात कुत्रे, मांजरी पाळतात, त्याचप्रमाणे या गावातील लोक कोबरा पाळतात.


हे गाव आहे तरी कुठे?


महाराष्ट्रातील या गावाचं नाव आहे. शेतपाळ आणि हे गाव सोलापूर जिल्ह्यात आहे. या गावातील मुलं देखील सापांसोबतच खेळताना दिसतात, हे साप त्यांना इजा करू शकत नाहीत, असा येथील लोकांचा समज आहे. या गावात सुमारे अडीच हजार लोक राहतात आणि गावातील बहुतेक घरांमध्ये तुम्हाला एक किंवा दोन कोबरा दिसतील. येथील लोक सापांना शुभ मानतात आणि जोपर्यंत हे साप त्यांच्या घरात आहेत, तोपर्यंत त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे.


घरांमध्ये नागासाठी खास जागा


शेतपाळ गावात नागांना इतकं प्रेम दिलं जातं की, प्रत्येक घरात त्यांच्यासाठी एक खास जागा बनवली जाते, जेणेकरून ते तिथे येऊन राहू शकतील. खरं तर, या गावात घर बांधणारा प्रत्येक माणूस आपल्या घरात कोबरासाठी एक लहान घर बांधतो, जसे सामान्य लोक आपल्या पाळीव कुत्र्या आणि मांजरींसाठी घर बांधतात. आपल्या अनोख्या छंदामुळे हे गावकरी आता जगभरात लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळेच आता या गावात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. बाहेरचे लोक सापांपासून अंतर राखत असले तरी गावकरी देखील बाहेरच्या लोकांना सापाजवळ न जाण्याच्या सूचना देतात.


गावात आतापर्यंत एकालाही सर्पदंश नाही


या गावाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, येथे पुरातन काळापासून सापांची पूजा केली जाते. त्यामुळेच गावातील प्रत्येक घरात सापांना खूप महत्त्व आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाला सापांची खूप आवड आहे, त्यामुळे येथे साप पाळले जातात. आश्‍चर्याची बाब म्हणजे, या गावात आजपर्यंत एकाही व्यक्तीला साप चावलेला नाही. घरात सापांना राहण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात येते, ही जागा घराच्या छतावर बांधलेली असते, ज्याला देवस्थान म्हणतात. तसेच, शेतपाळ गावात अनेक नाग मंदिरं देखील आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Karnataka: "हा हिंदूंचा देश, तुम्ही पाकिस्तानात निघून जा"; नेमकं मुस्लिम विद्यार्थ्यांना काय म्हणाली शिक्षिका? तपास सुरू