एक्स्प्लोर
पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

नवी दिल्ली : देशातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महत्वाची बैठक बोलवली आहे. यामध्ये दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळं आजच्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीला उपस्थित राहतील. दुष्काळ निवारण करण्यासाठी उपाय योजना करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यंमंत्र्यांशी चर्चा करुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थिती जाणून घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी दुष्काळाशी लढण्यासाठी केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या मदत निधीवरही चर्चा करणार आहेत.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















