एक्स्प्लोर

मुख्यमंत्री पर्रिकरांकडून गोवा विधानसभेत अर्थसंकल्प सादर

गेल्या वर्षाच्या तुलनेत गोव्याच्या अर्थसंकल्पाचा आकार 14.16 टक्क्यांनी वाढला आहे. 1200 कोटी रुपयांची वित्तीय तूट असली तरी 455.10 कोटी रुपयांचा हा शिल्लकी अर्थसंकल्प आहे.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आजारी असतानाही बुधवारी विधानसभेत स्वतः येऊन सादर केला. 2019-2020 वर्षांसाठीचा 19 हजार 548 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षीही अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अमेरिकेतील उपचार मध्येच थांबवून पर्रिकर विधानसभेत आले होते. अखेरच्या श्वासापर्यंत मी निष्ठेने गोव्याची सेवा करत राहीन. गोमंतकीयांनी मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. माझ्यात जोशही आहे आणि होशही, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसने लगावलेल्या टोल्यावर दिलं. गेल्या वर्षाच्या तुलनेत गोव्याच्या अर्थसंकल्पाचा आकार 14.16 टक्क्यांनी वाढला आहे. 1200 कोटी रुपयांची वित्तीय तूट असली तरी 455.10 कोटी रुपयांचा हा शिल्लकी अर्थसंकल्प आहे. खरं तर हा अर्थसंकल्प बुधवारी दुपारी अडीच वाजता सादर होणार होता. मात्र सकाळच्या सत्राला गैरहजर असलेले मुख्यमंत्री बरोबर अडीच वाजता पोहचू शकले नाहीत. सभापती डॉ. प्रमोद सावंत आसनावर येऊन बसले आणि विधानसभेचं कामकाज सुरु झालं. विरोधी पक्षातील काँग्रेस आमदार सभागृहात उपस्थित होते, पण सत्ताधाऱ्यांमधील एकही आमदार सभागृहात नव्हता. यामुळे सभापतींनी पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. गोवा विधानसभेला असा अनुभव प्रथमच आला. मुख्यमंत्री पर्रिकर येताच सर्व सत्ताधारी सदस्य सभागृहात आले. पर्रिकरांनी बसूनच अर्थसंकल्प सादर करावा, अशी सूचना सभापतींनी केली. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आपल्या आसनावर बसूनच साडेपाच मिनिटं अर्थसंकल्प वाचून दाखवला. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्प पटलावर सादर करण्यास सांगितला. त्यानंतर अर्थसंकल्पाची प्रत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व विधानसभा सदस्यांना दिली जाईल, असं सभापतींनी जाहीर केलं. प्रथमच आमदारांना आयपॅड, तर पत्रकारांना टॅबलेटवर डिजिटलाईज रुपात अर्थसंकल्प दिला गेला. कृषी, शिक्षण, साधनसुविधा निर्माण, आरोग्य अशा क्षेत्रांवर अर्थसंकल्पातून भर देण्यात आला असल्याचं पर्रिकरांनी नमूद केलं. पर्रिकरांचं वाचन झाल्यानंतर कामकाज संपलं. तत्पूर्वी सगळा अर्थसंकल्प वाचला, असं गृहित धरावं, असं सभापतींनी जाहीर केलं. अर्थ सचिव दौलतराव हवालदार यांनी अर्थसंकल्पाची काही वैशिष्ट्यं सभागृहाबाहेर पत्रकारांना सांगितली. पाच महिन्यांसाठी लेखानुदान घेतले जाणार आहे. कर प्रस्ताव आणि योजना वर्षभराच्या प्रक्रियेत येतील. त्यांचा समावेश अर्थसंकल्पात नाही. अर्थसंकल्पातील आकडेवारी म्हणजे एस्टिमेट आहे. अंदाजित खर्च आणि अंदाजित आर्थिक प्राप्ती अर्थसंकल्पातून सांगितली गेली आहे, असं हवालदार यांनी स्पष्ट केलं. गेल्या वर्षी राज्याचा अर्थसंकल्प 17 हजार 123.28 कोटी रुपये खर्चाचा होता. यंदा त्यात 14 टक्क्यांनी वाढ झाली. गेली सलग तीन वर्षे शिल्लकी अर्थसंकल्प सादर केला जात आहे, असं हवालदार यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Embed widget