एक्स्प्लोर

स्पीड गव्हर्नर कायम राहाणार, तडजोड नाही : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर

"स्पीड गव्हर्नर बसवणे कायद्याने अनिवार्य असून, त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर संबंधित वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट मिळणार नाहीत," असं आज गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले.

पणजी : "स्पीड गव्हर्नर बसवणे कायद्याने अनिवार्य असून, त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर संबंधित वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट मिळणार नाहीत," असं आज गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले. सरकार आणि टॅक्सी चालक संघटना आपापल्या मतांवर ठाम राहिल्याने आज दुसऱ्या दिवशीदेखील टॅक्सी चालकांच्या संपावर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे उद्या तिसऱ्या दिवशीही टॅक्सी चालकांचा संप सुरु राहण्याची शक्यता आहे. “स्पीड गव्हर्नर देशात सगळीकडे बसवाला जात असताना, गोव्यात देखील त्याची कायद्यानुसार अंमलबजावणी करावी लागेल. सरकारने स्पीड गव्हर्नर बसवण्यासाठी दिलेली मुदत 24 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर स्पीड गव्हर्नर न बसवलेल्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट मिळणार नाही,” असे आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले. केंद्राचा कायदा सगळ्यांसाठी बंधनकारक मुख्यमंत्री म्हणाले, “केंद्राचा कायदा सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. जर कोणाकडे त्याचे कायदेशीर सॉल्युशन असेल, तर त्यांनी ते माझ्या नजरेस आणून द्यावे,” असे आवाहन पर्रिकरांनी यावेळी केले. दुसरीकडे टॅक्सी चालकांच्या संपाला काँग्रेस नेत्यांकडून समर्थन मिळत आहे. आज महिला प्रदेश समितीने संपकऱ्यांना पाठिंबा दिला. तर काँग्रेस प्रदेशाध्यश शांताराम नाईक हे उद्या (21 जानेवारी) दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन; संपावर तोडगा काढण्याची मागणी करणार आहेत. सरकारी खात्यातील 'त्या' टॅक्सींचे करार रद्द होणार दरम्यान, "सरकारने अनेक खात्यांमध्ये खासगी टॅक्सी भाड्याने घेतल्या आहेत. करारानुसार, या टॅक्सींनी आपली सेवा देणे अनिवार्य असल्याने ज्यांनी अशा प्रकारची सेवा न देऊन कराराचा भंग केला आहे, त्यांचे करार रद्द केले जाणार आहेत," असेही मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज सांगितले. बसचालक संघटना उद्या निर्णय घेणार बसचालक संघटना टॅक्सी चालकांच्या संपाला पाठिंबा देणार की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उद्या बसचालक संघटनांची बैठक होणार असून त्यात संपाला पाठिंबा द्यायचा की, नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पर्यायी व्यवस्थेची सोमवारी घोषणा दुसरीकडे टॅक्सी चालकांनी रितसर नोटीस दिलेली नाही आणि मागण्याचे निवेदन देखील कोणी आपल्याकडे दिले नसल्याचे, आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सोमवारी ओला, उबर किंवा त्याधर्तीवरील टॅक्सी सेवा सुरु करण्याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या गोव्यात टूरिस्ट टॅक्सी चालकांचा संप चिघळला

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: तब्बल 11 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार श्रद्धा दुबेला नागपुरात अटक, बहीण अन् ड्रॉयव्हरलाही बेड्या, नेमकं प्रकरण काय?
तब्बल 11 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मॉडेल श्रद्धा दुबेला नागपुरात अटक, बहीण अन् ड्रॉयव्हरलाही बेड्या, नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दराचा ग्राहकांना चटका! तब्बल 21 राज्यात साखरेच्या दरात 30 टक्क्यांची वाढ, सध्याचा दर काय?
साखरेच्या दराचा ग्राहकांना चटका! तब्बल 21 राज्यात साखरेच्या दरात 30 टक्क्यांची वाढ, सध्याचा दर काय?
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
देशातील वीज संकट अधिक गडद! 9 राज्यांकडून अतिरिक्त विजेची मागणी, रात्री अंधार पसरणार का? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
देशातील वीज संकट अधिक गडद! 9 राज्यांकडून अतिरिक्त विजेची मागणी, रात्री अंधार पसरणार का? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

व्हिडीओ

Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार? महायुती अन् महाविकास आघाडीत बैठकांचा जोर
सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार? महायुती अन् महाविकास आघाडीत बैठकांचा जोर
Thane Crime Chena Forest: बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक
बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक
Tiger Shroff Rapido Post: टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
IND Vs NZ 1st T20 Playing-11 : भुवनेश्वर कुमार IN, वैभवसह 4 खेळाडू OUT; न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing-11
भुवनेश्वर कुमार IN, वैभवसह 4 खेळाडू OUT; न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing-11
Rohit Pawar: रोहित पवार म्हणाले 'आम्ही आमची लेव्हल बघून बोलतो', राजेंद्र राऊतांचा पलटवार, 'रोहित पिल्लू तू जास्त शहाणपणा...'
रोहित पवार म्हणाले 'आम्ही आमची लेव्हल बघून बोलतो', राजेंद्र राऊतांचा पलटवार, 'रोहित पिल्लू तू जास्त शहाणपणा...'
Darlings Actress Death: आलिया भट्टच्या को-स्टारचं निधन; विद्या बालनसोबतही स्क्रीन केली शेअर, बॉलिवूड अभिनेत्रीच्या निधनामुळे मैत्रिणीला बसला धक्का
आलिया भट्टच्या को-स्टारचं निधन; विद्या बालनसोबतही स्क्रीन केली शेअर, बॉलिवूड अभिनेत्रीच्या निधनामुळे मैत्रिणीला बसला धक्का
Satara Road Accident: ट्रकच्या धडकेने स्कॉर्पिओचा चेंदामेंदा, सीटवर रक्ताचा सडा, साताऱ्यातील अपघाताचे भयानक फोटो
ट्रकच्या धडकेने स्कॉर्पिओचा चेंदामेंदा, सीटवर रक्ताचा सडा, साताऱ्यातील अपघाताचे भयानक फोटो
Embed widget