नैनीताल : 2013 साली उत्तराखंडमध्ये आलेल्या महाभयंकर प्रलयाला 3 वर्ष उलटून गेली आहेत. प्रलयाच्या कटू आठवणीतून उत्तराखंड सावरत असतानाच पुन्हा एकदा ढगफुटी होऊन इथं हाहा:कार माजला आहे. पावासानं दाखवलेल्या अक्राळविक्राळ रुपामुळं उत्तराखंडची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे.

 

ढगफुटीमुळे कर्णप्रयागजवळचा बद्रीनाथ हायवे तर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पोलीसही आपल्या परीनं परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

तर दुसरीकडं आजपासून उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला सुरुवात होणार आहे. आज सकाळी केदारनाथ धाममध्ये पूजा होईल. त्यानंतर बद्रीनाथ , गंगोत्री, यमुनेत्री प्रवेशद्वार उघडतील. त्यामुळं भक्तांची गर्दी पाहायला मिळते आहे.