एक्स्प्लोर

JNU BBC Documentary Screening: मोदींच्या डॉक्युमेंटरीवरून अभाविप-डाव्यांमध्ये जेएनयूत राडा; वीज पुरवठा बंद, दगडफेक झाल्याचा आरोप

JNU BBC Documentary Screening: बीबीसीच्या माहितीपटावरून जवाहरलाल विद्यापीठात मोठा गदारोळ झाला आहे. फोनवर माहितीपट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

JNU BBC Documentary Screening: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेल्या गुजरात दंगलीवर त्यांच्या भूमिकेबाबत भाष्य करणाऱ्या माहितीपटावरून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राडा झाला. भाजप-संघाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. जेएनयू विद्यार्थी संघाच्या कार्यालयात डॉक्युमेंटरीचे स्क्रिनिंग सुरू असताना अचानकपणे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर दगडफेक झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. 

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्यावतीने विद्यार्थी संघाच्या कार्यालयात डॉक्युमेंटरी दाखवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मात्र, स्क्रनिंग दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने वीज पुरवठा खंडित केला असल्याचा आरोप JNU विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयशी घोषने केला आहे. 

डॉक्युमेंटरी स्क्रिनिंगला विद्यापीठाचा विरोध 

डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग रात्री 9 वाजता सुरू होणार होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून याला परवानगी नाकारण्यात आली होती. विद्यापीठाच्या आदेशाला न जुमानता विद्यार्थ्यांनी माहितीपट दाखवण्याचा निर्णय घेतला. जेएनयू प्रशासनाने स्क्रीनिंगला परवानगी दिली नाही. तसेच डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगनंतर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही सांगितले. तथापि, विद्यार्थ्यांनी आग्रह धरला की स्क्रीनिंगमुळे कोणत्याही विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही किंवा जातीय सलोखा बिघडणार नाही. 

डॉक्युमेंटरीवर बंदी नाही

जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयशी घोषने सांगितले की, आम्ही या डॉक्युमेंटरीचे स्क्रिनिंग करणार आहोत. बीबीसीच्या या डॉक्युमेंटरीवर कोणतीही बंदी नाही. हा माहितीपट सत्य दाखवत आहे आणि भाजपला आपले कारनामे बाहेर येतील, अशी भीती आहे,  असे आयेशी घोषने सांगितले. डॉक्युमेंटरी दाखवण्यास मज्जाव केल्यास आम्ही आणखी स्क्रिनिंग करू असा निर्धारही आयेशी घोषने व्यक्त केला. 

भाजपला घाबरत नाही

अभाविपला या स्क्रिनिंगवर आक्षेप होता तर त्यांनी याचा निषेध करणारे पत्र लिहायला हवे होते. विद्यापीठ कॅम्पस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणार नाही. भाजपला आम्ही घाबरत नसल्याचे आयेशी घोषने म्हटले. 

सरकारची भूमिका काय?

बीबीसीच्या ' ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या माहितीपट मालिकेबाबत बरेच वाद आहेत. ही मालिका भारतात उपलब्ध नाही, पण त्याच्या लिंक्स यूट्यूब आणि ट्विटरवर शेअर करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने डॉक्युमेंटरीचे एपिसोड असलेले यूट्यूब व्हिडिओ आणि ट्विटर लिंक ब्लॉक केले आहेत. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने हा माहितीपट 'प्रचाराचा भाग' म्हणून नाकारला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की त्यात वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे आणि वसाहतवादी मानसिकता प्रतिबिंबित करते असे सरकारने म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget