एक्स्प्लोर

भ्रष्टाचार प्रकरणी हायकोर्टाच्या न्यायाधीशांची सीबीआय चौकशी होणार, इतिहासातील पहिली घटना

उत्तरप्रदेशच्या अॅडव्होकेट जनरल यांनी सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांना याविषयी माहिती दिली होती. मिश्रा यांनी या विषयाला गांभीर्याने घेत एक चौकशी समिती गठीत केली होती.

अलाहाबाद : इतिहासात पहिल्यांदाच हायकोर्टाच्या न्यायाधीशांची सीबीआय चौकशी होणार आहे. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश एस एन शुक्ला यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआयला शुक्ला यांच्या विरोधात  FIR दाखल करण्यासाठी परवानगी दिली आहे. इतिहासात पहिल्यांदाच सीबीआयसारख्या यंत्रणेला न्यायाधीशांविरुद्ध चौकशीचे अधिकार देण्यात आले आहेत. न्यायाधीश शुक्ला यांच्या विरोधात मेडिकल कॉलेजला फायदा होण्याच्या उद्देशाने निकाल दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 2017 मध्ये हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाचे न्यायाधीश एस एन शुक्ला यांनी एका मेडिकल कॉलेजला 2017-18 या वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी मंजुरी दिली होती. मात्र ही मंजुरी देताना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वेळेचे पालन केले नव्हते. यानंतर उत्तरप्रदेशच्या अॅडव्होकेट जनरल यांनी सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांना याविषयी माहिती दिली होती. मिश्रा यांनी या विषयाला गांभीर्याने घेत एक चौकशी समिती गठीत केली होती. वेगवेगळ्या हायकोर्टाच्या तीन वरिष्ठ न्यायाधीशांच्या समितीने या प्रकरणात शुक्ला यांनी जाणूनबुझून चुकीचा निकाल दिला, असा अहवाल दिला होता. यानंतर या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. यानंतर मुख्य न्यायाधीश मिश्रा यांनी न्यायाधीश शुक्ला यांना पदावरून हटण्याबाबत सांगितले. मात्र शुक्ला यांनी नकार दिल्यानंतर  22 जनवरी 2018  पासून त्यांच्याकडून काम काढून घेत सुट्टीवर पाठवण्यात आले. यानंतर मुख्य न्यायाधीशांनी सीबीआयला या प्रकरणी चौकशी करण्याबाबत निर्देश दिले. सीबीआयने केलेल्या चौकशी न्यायाधीश शुक्ला दोषी आढळले. यानंतर सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली होती. याला सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी परवानगी दिली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आता न्यायाधीश शुक्ला यांना अटक देखील केली जाऊ शकते, अशी माहिती आहे. मुख्य न्यायाधीशांनी न्यायाधीश शुक्ला यांना पदावरून हटविण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेत प्रस्ताव ठेवण्यासंदर्भात शिफारस देखील केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
Ram Mandir Donation Case : राम मंदिर विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय; चंपत राय, अनिल मिश्र यांचे राजीनामे मंजूर, 'एसआयटी' चौकशी सुरू, बैठकीत नेमकं काय घडलं?
राम मंदिर विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय; चंपत राय, अनिल मिश्र यांचे राजीनामे मंजूर, 'एसआयटी' चौकशी सुरू, बैठकीत नेमकं काय घडलं?
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
Embed widget