एक्स्प्लोर

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन पदावरुन पायउतार!

आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन पद सोडणार आहेत. देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच फेसबुक पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिली.

नवी दिल्ली: माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यानंतर आता आणखी एका अर्थतज्ज्ञाने मोदी सरकारला रामराम केला आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच फेसबुक पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिली. अरविंद सुब्रमण्यन हे कौटुंबीक कारणामुळे अमेरिकेला परतणार आहेत. त्यामुळे आपल्याला पदमुक्त करावं, अशी विनंती त्यांनी केली होती. कौटुंबीक कारण पुढे केल्याने आपल्याकडे पर्याय नव्हता, असं अरुण जेटली यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्याशी चर्चा केली होती. त्याचवेळी त्यांनी कौटुंबीक जबाबदाऱ्यांमुळे अमेरिकेला परतणार असल्याचं म्हटलं होतं, असं जेटलींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अरविंद सुब्रमण्यन यांना 16 ऑक्टोबर 2014 रोजी तीन वर्षांसाठी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही मोदी सरकारने त्यांना विनंती करत, 1 वर्षांसाठी त्यांना मुदतवाढ दिली होती. अरविंद सुब्रमण्यन हे अर्थमंत्री अरुण जेटली यांचे जवळचे मानले जात होते. कोणतीही आर्थिक धोरणं ठरवताना ते सुब्रमण्यन यांचे सल्ला घेत असत. फेसबुकच्या पोस्टच्या शेवटी जेटली म्हणाले, “वैयक्तिकरित्या मला सुब्रमण्यन यांची बौद्धिक क्षमता, गतीशीलता, ऊर्जा आणि कल्पकतेची कमतरता जाणवेल. मी एक मंत्री असलो, तरी चांगल्या किंवा कोणत्याही घटना देण्यासाठी ते थेट माझ्या खोलीत येत होते. दिवसातून एकदा किंवा अनेकदा हे चित्र पाहायला मिळत होतं. मात्र आता ते सर्व मी मिस करणार आहे. पण मला माहीत आहे, ते मनाने आमच्यासोबतच असतील. मला विश्वास आहे की ते कुठेही असले तरी आम्हाला विश्लेषण आणि सल्ले देत राहतील. अरविंद सुब्रमण्यन आणि कुटुंबीयांना शुभेच्छा”

गोमांस बंदीबाबत बोललो तर नोकरी जाईल : अरविंद सुब्रमण्यम

महत्त्वाच्या बातम्या

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget