एक्स्प्लोर

बनावट पासपोर्ट प्रकरण : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चौघे दोषी

नवी दिल्ली : बनावट पासपोर्ट प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने हा निर्णय दिला आहे. दोषी ठरवलेले इतर तिघे हे पासपोर्ट कार्यालयाचे निवृत्त अधिकारी आहेत. छोटा राजनसह चौघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. 70 पैकी अधिक खटल्यात आरोपी असलेल्या छोटा राजनविरोधातील हे पहिलं प्रकरण असेल, ज्यावर कोर्ट त्याला शिक्षा सुनावणार आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाने चौघांविरोधात भारतीय दंडविधान कलम 420, 468, 471, 120बी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. सीबीआयने पहिलं आरोपपत्र फेब्रुवारी 2016 मध्ये कोर्टात दाखल केलं होतं. यामध्ये छोटा राजनसह बंगळुरुच्या तीन निवृत्त अधिकाऱ्यांच्याही नावाचा उल्लेख केला होता. सीबीआयनुसार, आरोपपत्रात चारही आरोपींचा फसवणूक, षडयंत्र रचणं आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत उल्लेख केला आहे. सप्टेंबर 2003 मध्ये मोहन कुमार नावावर बनलेल्या बनावट पासपोर्ट आणि टूरिस्ट व्हिसावर छोटा राजनने भारतातून ऑस्ट्रेलियात पळ काढला होता. यानंतर तिथे तो सुमारे 12 वर्ष राहिला. ऑक्टोबर 2015 मध्ये जेव्हा छोटा राजन ऑस्ट्रेलियाहून इंडोनेशियाला पोहोचला, तेव्हा इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली. इंडोनेशियन पोलिसांनी त्याला बालीमध्ये अटक केली. त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये त्याला भारताकडे सोपवलं. छोटा राजन सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैद आहे. त्याची सुरक्षा लक्षात घेऊन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget