N Biren Singh : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यात भाजपला चांगले यश मिळाले आहे. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, आज एन बिरेन सिंह (N Biren Singh) हे आज मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दुपारी 3 वाजता शपथविधीचा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहणार आहे.


दरम्यान, एन बिरेन सिंह हे मणिपूरमध्ये सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. बिरेन सिंह आज दुपारी ३ वाजता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपकडून केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेल्या निर्मला सीतारामन यांनी बीरेन सिंग हे मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, अशी घोषणा केली होती. निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले की, सर्वांच्या मताने एन बिरेन सिंह यांची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. लोकांनी घेतलेला हा एक चांगला निर्णय आहे. ज्यामुळे राज्यात स्थिर आणि जबाबदार सरकार असेल. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक बडे नेतेही हजेरी लावणार आहेत.


भाजपने बहुमताचा आकडा पार केला


10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत देशातील पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर या पाच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या सर्व राज्याचे निकाल 10 मार्चला लागले होते. यामध्ये पंजाब वगळता अन्य चार राज्यात भाजपने चांगले यश मिळवले आहे. मणिपूर विधानसभेत एकूण 60 जागा आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपने 32 जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला. 2017 मध्ये, भाजपने राज्यात प्रथमच सरकार स्थापन केले होते. 2017 ला भाजपने 21 जागा जिंकल्या होत्या. 


बिरेन सिंह यांचा परिचय


 बिरेन सिंह यांनी 2002 साली राजकारणात प्रवेश केल्यानंतर काही काळातच ते काँग्रेसवासी झाले. काँग्रेसने 2003 मध्ये त्यांच्याकडे दक्षता राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली. यानंतर 2007 मध्ये त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयासह, पूर नियंत्रण आणि युवक कल्याण आणि क्रीडा खात्याचाही भार दिला. मात्र, ऑक्टोंबर 2016 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याविरोधात बंड करुन आपल्या विधासभा सदस्यासह राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


महत्त्वाच्या बातम्या: