Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केला असून त्यामध्ये 7 जवान शहीद झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहे. नक्षलवाद्यांनी याठिकाणी अगोदरच भूसुरुंग पेरलं होतं. या भूसुरुंगाच्या ठिकाणी जवानांचे वाहन येताच नक्षलवाद्यांनी तत्काळ त्याचा स्फोट केल्याची माहिती आहे.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कुत्रु ते बेद्रे मार्गावर करकेलीजवळ नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या पिकअप वाहनाचा स्फोट केला आहे. नक्षल ऑपरेशन्सचे एडीजी विवेकानंद सिन्हा यांनी या हल्ल्यात आतापर्यंत 9 जवान शहीद झाल्याची पुष्टी केली आहे. शहिदांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही जवान जखमीही झाले आहेत.
आगोदरच भूसुरुंग पेरलं होतं
पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी मोहिमेवरून छावणीकडे परतत असलेल्या वाहनात 15 हून अधिक जवान होते. सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी अगोदरच भूसुरुंग पेरलं होतं. त्या ठिकाणी जवानांचे वाहन येताच त्याचा मोठा स्पोट झाला. यामध्ये 9 जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरमधील संयुक्त कारवाईनंतर सैनिक परतत होते. सोमवारी दुपारी 2.15 च्या सुमारास, विजापूरच्या कुत्रु पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ अज्ञात नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाने सुरक्षा दलाचे वाहन उडवले.
ही बातमी वाचा: