Hijab Controversy :  हिजाब प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या हायकोर्टच्या न्यायमूर्तींबद्दल ट्वीट करण अभिनेता चेतन कुमारला (chetan kumar) भोवल आहे. बंगळुरू(Bengaluru) पोलिसांनी चेतनला मंगळवारी (22 फेब्रुवारी) अटक केली आहे. पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, दाक्षिणात्य अभिनेता चेतन कुमारला हिजाब प्रकरणाबद्दल सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तींबाबत  ट्वीट केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.
 
केंद्रीय विभागाचे पोलीस उपायुक्त एम एन अनुचेठ यांनी माहिती दिली, 'दाक्षिणात्य अभिनेता चेतन कुमारला  बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी IPC चे कलम 505(2) आणि 504 अंतर्गत 
एफआयआर नोंदवण्यात आला आहे. चेतननं केलेल्या ट्वीटच्या आधारे शेषाद्रिपुरम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.' 


अभिनेता चेतन कुमार यांनी 16 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्याबद्दलचे जुने ट्विट रिट्विट केले होते.  जुन्या ट्विटमध्ये न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांनी बलात्काराच्या आरोपीला अटक करण्यापूर्वी जामीन देण्याबाबत लिहिले होती. हेच ट्वीट रिट्वीट करून चेतननं न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्याबद्दल आपत्तिजनक टिप्पणी केली असा त्याच्यावर आरोप आहे. चेतन कुमार याने  ट्वीटमध्ये लिहिले होते, 'हे ट्वीट मी दोन वर्षा पूर्वी केले होते. यामध्ये मी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत लिहिले होते. '










LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha