नवी दिल्ली : आता आपल्याला इंजिनिअर म्हणून करियर करायचं असेल तर बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM)  हे विषय नसले तरी चालणार आहेत. तशा प्रकारचं नवं धोरण ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) जाहीर केलं आहे. त्यामुळे इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे. 


आतापर्यंतच्या नियमानुसार इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे तीन विषय असणं बंधनकारक होतं. तो अडथळा आता ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (AICTE) नव्या धोरणाने दूर झाला आहे. 


दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइन व वेळापत्रकानुसारच घेण्यावर शिक्षण विभाग ठाम, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती


ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) 2021-22 या वर्षासाठी एक हॅन्डबुक जाहीर केलं आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेण्यासाठी बारावीला कोणते विषय आवश्यक आहेत त्याची माहिती दिली आहे. गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बायोलॉजी, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, कृषी, बिजनेस स्टडीज् आणि इंजिनियरिंग ग्राफिक्स या विषयांपैकी कोणतेही तीन विषय बारावीसाठी असतील तरीही आता इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळणार आहे. 


इंजिनिअरिंगला प्रवेशासाठी सामान्य विद्यार्थ्यांना 45 टक्के आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण आवश्यक आहेत. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या या नव्या निर्णयाचे स्वागत काही घटकातून करण्यात येत असलं तरीही काही घटकातून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या निर्णयाने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरेल असं मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. 


MPSC Exam | पुण्यातील एमपीएससी आंदोलन प्रकरणी गोपीचंद पडळकरांसह 9 जण अटकेत, 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल