नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज आयटी नियम, 2021 च्या पार्श्वभूमीवर आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन (डीएनपीए) सोबत बातचीत केली. या कॉन्फरन्सला इंडिया टुडे, दैनिक भास्कर, हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, एबीपी, इनाडू, दैनिक जागरण, लोकमत इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते.


जावडेकर यांनी यावेळी सांगितलं की, नवीन आयटी नियमांमुळे डिजिटल वृत्त प्रकाशकांवर काही जबाबदाऱ्या आहेत. यामध्ये प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने तयार केलेल्या पत्रकारितेच्या आचरणाचे निकष आणि केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यांतर्गत प्रोग्राम कोड या आचारसंहितेचा समावेश आहे. याशिवाय नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करणाऱ्यासाठी नियमामध्ये तीन स्तरीय तक्रार निवारण तंत्र उपलब्ध केलं आहे, ज्यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर डिजिटल वृत्त प्रकाशक आणि त्यांच्याद्वारे नियुक्त केलेल्या स्वयं-नियामक संस्था असतील. .


डिजिटल वृत्त प्रकाशकांनाही अंतिम रुप देण्यात येणारी काही मूलभूत माहिती सोप्या स्वरुपात मंत्रालयाला  देण्याची आवश्यकता आहे आणि वेळोवेळी त्यांच्यामार्फत करण्यात आलेल्या तक्रारीचे निवारण त्यांना सार्वजनिक करावं लागेल. ते म्हणाले की, "प्रिंट मीडिया आणि टीव्ही चॅनल्सच्या डिजिटल आवृत्त्या आहेत, ज्यांची माहिती सध्याच्या प्लॅटफॉर्मवर जवळजवळ समान आहे. पण अशीही सामग्री असते जी विशेषत: डिजिटल प्लॅटफॉर्मसाठीच आहे. या व्यतिरिक्त बऱ्याच संस्था आहेत ज्या केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यानुसार, हे नियम डिजिटल माध्यमांवरील बातम्यांनाही लागू व्हायला हवे, जेणेकरुन त्या सध्याच्या माध्यमांच्या बरोबरीने आणता येतील.


नवीन नियमांचे स्वागत करताना सहभाग झालेले प्रतिनिधी म्हणाले की, "टीव्ही आणि न्यूज प्रिंट मीडिया बऱ्याच काळापासून केबल टेलिव्हिजन नेटवर्क अ‍ॅक्ट आणि प्रेस कौन्सिल कायद्याच्या नियमांचे पालन करत आहेत. याशिवाय डिजिटल आवृत्तीच्या प्रकाशनासाठी प्रकाशक सध्याच्या नियमांचं पालन करतात. केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या वृत्त प्रकाशकांपेक्षा त्यांच्याशी वेगळे वागलं पाहिजे असं त्यांना वाटतं. 


आपलं मत मांडल्याबद्दल प्रकाश जावडेकर यांनी सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींचे आभार मानले आणि सरकार यावर विचार करेल, असं आश्वासन दिलं. तसंच मीडिया क्षेत्राच्या समग्र विकासासाठी सल्लामसलत सुरु राहिल असं सांगितलं.