Avalanche in Uttarkashi : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तराखंडमध्ये  हिमस्खलन (Avalanche) झालं असून, यामध्ये 10 गिर्यारोहकांच्या मृत्यू (10 mountaineers killed) झाल्याचे वृत्त आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील द्रौपदी दंड-2 शिखरावर ही घटना घडली आहे. हिमस्खलन झाल्यानं 28 गिर्यारोहक अडकले होते. दरम्यान, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या घटनेबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांनी शोक व्यक्त केला आहे. विविध पथकांकडून बचाव आणि मदत कार्य सुरु असल्याचे शाह म्हणाले.


हिमस्खलनाची घटना अत्यंत दुःखद, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त


अडकलेल्या गिर्यारोहकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. काही  गिर्यारोहकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यानंतरही हिमस्खलनात काही गिर्यारोहक अडकल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिमस्खलनात अडकलेल्या 10 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. उत्तरकाशीमध्ये हिमस्खलनाची घटना अत्यंत दुःखद आहे. यासंदर्भात मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन, SDRF, NDRF, ITBP आणि लष्कराचे पथक पूर्ण तयारीनिशी मदत आणि बचाव कार्यात गुंतले असल्याचे शाह म्हणाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलून बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराची मदत मागितली आहे. 


हवाई दलाकडून मदत सुरु


उत्तरकाशी जिल्ह्यातील द्रौपदी दंड-2 शिखर हे 14 हजार फूट उंचीवर आहे. संपूर्ण परिसर बर्फाने अच्छादलेला आहे. या भागात पोहोचणे हे एक मोठं आव्हान आहे. हवाई दलाचे हेलिकॉप्टर देखरेक करत आहेत. एसडीआरएफचे आयजी रिद्धीम अग्रवाल यांनी  दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीची पाहणी केल्यानंतर बर्फात अडकलेल्या गिर्यारोहकांच्या सुटकेसाठी हवाई दलाचे पथक रवाना झाले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या घटनेबाबत धामी यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराची मदत घेण्याची विनंती धामी यांनी राजनाथ सिंह यांना केली आहे. राजनाथ सिंह यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती धामी यांनी दिली आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलन, गस्तीला गेलेल्या सात जवानांचा मृत्यू