Chandrayaan-3 Latest Update : इस्रोचं (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan 3) नं चंद्राच्या (Moon) दक्षिण ध्रुवावर (Lunar South Pole) उतरलं आणि भारतानं (India) इतिहास रचला. यानंतर इस्रोकडून विविध प्रयोग आणि चाचणी करण्यात येत आहेत, ज्याआगामी चंद्रमोहिमांसाठी (Lunar Mission महत्त्वाच्या ठरणार आहे. इस्रोच्या चांद्रयान-3 चा आणखी एक प्रयोग यशस्वी झाला आहे. चांद्रयान-3नं घरवापसी केली आहे. चांद्रयानचं प्रॉपल्शन मॉड्यूल लूनार ऑर्बिटमधून पृथ्वीच्या कक्षेत परतलं आहे. याद्वारे इस्रोनं सिद्ध केलं आहे की, भारत अंतराळात यान पाठवून ते पृथ्वीवर सुरक्षितरित्या आणू शकतो.
इस्रोच्या चांद्रयान-3 ची घरवापसी
चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणानंतर प्रॉपल्शन मॉड्यूल आधी पृथ्वी आणि त्यानंतर चंद्राला प्रदक्षिणा घालत होतं. त्यातून लँडर आणि रोव्हर वेगळे झाले, जे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. आता लूनार ऑर्बिटमधून म्हणजेच चंद्राला प्रदक्षिणा घालणारं प्रॉपल्शन मॉड्यूल इस्रोनं परत माघारी पृथ्वीच्या कक्षेत आणलं आहे.
प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतलं
इस्रोने सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती देताना लिहिलं आहे की, आणखी एका अनोख्या प्रयोगात प्रॉपल्श मॉड्यूल (PM) ला चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशाजवळ सॉफ्ट लँडिंग करून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमधील उपकरणे वापरून चंद्रावर संशोधन आणि प्रयोग करणे हे चांद्रयान-3 मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होतं. भारताचं चांद्रयान-3 14 जुलै 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आलं होतं.
23 ऑगस्टला चंद्रावर यशस्वी लँडिंग
त्यानंतर चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर ऐतिहासिक लँडिंग केलं आणि इतिहास रचला. ISRO ने एका निवेदनात म्हटले आहे की, "चांद्रयान-3 मोहिमेची उद्दिष्टे पूर्णपणे साध्य झाली आहेत. प्रोपल्शन मॉड्यूलचे प्राथमिक उद्दिष्ट पृथ्वीच्या कक्षेपासून (GTO) चंद्राच्या ध्रुवीय कक्षापर्यंत लँडर मॉड्यूल लाँच करणे आहे. चंद्राच्या कक्षेत पोहोचून लँडर वेगळे करावं लागलं. लँडर विभक्त झाल्यानंतर, पेलोड ‘स्पेक्ट्रो-पोलारिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ’ देखील प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये कार्यरत होते. हे प्रोपल्शन मॉड्यूल पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत आणण्यात इस्रोला यश आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :