DOMS IPO: पेन्सिल उत्पादक कंपनी (Pencil Producers Company) डोम्स इंडस्ट्रीज (DOMS Industries) पुढील आठवड्यात आपला IPO लॉन्च करणार आहे. या IPO द्वारे, कंपनीनं बाजारातून 1200 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. कंपनीनं सेबीला सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, कंपनीच्या IPO मध्ये 350 कोटी रुपयांपर्यंतचा फ्रेश इश्यू आणि प्रवर्तकांना 850 कोटी रुपयांपर्यंत ऑफर-फॉर-सेलचा समावेश आहे. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग शेअर बाजाराच्या दोन्ही इंडेक्स सेन्सेक्स-निफ्टी (Sensex-Nifty) वर होणार आहे.
13 डिसेंबर रोजी उघडेल IPO
डोम्स IPO मध्ये OFS अंतर्गत, कॉर्पोरेट प्रमोटर F.I.L.A. - फॅब्रिका इटालियाना लॅपिस एड एफिनी एस.पी.ए. (Fabbrica Italiana Lapis ed Affini S.p.A.) हे 800 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. वैयक्तिक प्रमोटर - संजय मनसुखलाल रजनी आणि केतन मनसुखलाल रजनी प्रत्येकी 25 कोटी रुपयांचे शेअर्स विकतील. रिपोट्सनुसार, हा इश्यू 13 डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदार 15 डिसेंबरपर्यंत यामध्ये पैसे गुंतवू शकतील.
T+3 सिस्टमद्वारे लिस्टिंग
IPO च्या वाटपाची तारीख 18 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे, तर शेअर्स 19 डिसेंबर रोजी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जाऊ शकतात. यासोबतच, कंपनीनं आपल्या लिस्टिंगसाठी 20 डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे. विशेष बाब म्हणजे, 1 डिसेंबरपासून शेअर बाजारात T+3 टाईमलाईन अनिवार्य करण्यात आली आहे आणि या सिस्टमद्वारे बाजारात पदार्पण करणारी ही पहिली कंपनी ठरणार आहे.
जमा झालेला पैसा इथे वापरला जाणार
डोम्स इंडस्ट्रीज IPO द्वारे उभारलेल्या निधीचा वापर अनेक उपकरणं, वॉटर कलर पेन, मार्कर आणि हायलायटर्सच्या सीरिजच्या मॅन्युफॅक्चरिंगसोबत सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी करणार आहे. याशिवाय, कंपनीची उत्पादन क्षमता वाढवण्याची आणि नवीन उत्पादन युनिट स्थापन करण्याचीही कंपनीची योजना आहे. कंपनी देशांतर्गत बाजारपेठेत तसेच अमेरिका, आफ्रिका, पॅसिफिक आशिया, युरोप आणि मध्य पूर्वेसह आंतरराष्ट्रीय स्तरावर 40 पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उत्पादनं विकते.
डोम्स इंडस्ट्रीजचं मोठं नेटवर्क
कंपनीकडे उमरगाव, गुजरात आणि बारी ब्रह्मा, जम्मू आणि काश्मीर येथे 11 उत्पादन सुविधा आहेत. कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर मल्टी-चॅनेल वितरण नेटवर्क आहे, ज्याची संपूर्ण भारतामध्ये मजबूत उपस्थिती आहे. सामान्य व्यापारासाठी देशांतर्गत वितरण नेटवर्कमध्ये 100 सुपर-स्टॉकिस्ट आणि 3,750 वितरकांचा समावेश आहे जे 3,500 शहरं आणि शहरांमध्ये 115,000 रिटेल टच पॉइंट्स कव्हर करतात.
T+3 सिस्टम म्हणजे काय?
मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI) ने Initial Public Offering म्हणजेच, आयपीओ (IPO) बंद झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या स्टॉक्सची लिस्टिंग होण्याची वेळ मर्यादा अर्ध्यापर्यंत म्हणजेच, तीन दिवसांपर्यंत केली आहे. यापूर्वी ही वेळ मर्यादा सहा दिवसांची होती. लिस्टिंगच्या या नव्या नियमामुळे आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्यांसोबतच इन्वेस्टमेंट करणाऱ्यांनाही फायदा होणार आहे. SEBI ने यासंदर्भात यापूर्वीच अधिसूचना जारी केली आहे.
(टिप : वरील तपशील केवळ माहितीसाठी वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आयपीओ मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी शेअर मार्केट संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
रतन टाटांची 'ही' कंपनी होणार नामशेष! NCLT कडून विलीनीकरणास मान्यता