Chandrayaan 3 Launch: भारताच्या 'चांद्रयान-3' (Chandrayaan-3) या महत्त्वाकांक्षी मिशनने आज आकाशात यशस्वी उड्डाण केलं आणि देशवासियांचा ऊर उभिमानाने भरून आला. आजचा दिवस हा भारतीय अंतराळ इतिहासातील सोनेरी दिवस असून भारतीयांच्या आशा आणि स्वप्नांची झेप असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तर हा देशाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी प्रतिक्रिया दिली.
अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल 615 कोटी रुपये खर्च केलेत. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-3 ने 40 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरेल.
काय म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू?
अंतराळ संशोधनातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून भारताने चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण केले. या यशानंतर इस्त्रोचे अभिनंदन. टीममधील प्रत्येकजण ज्यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांचे अभिनंदन. हे अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी देशाची अटल वचनबद्धता दर्शवते. चंद्र मोहिमेच्या यशस्वीतेसाठी माझ्या शुभेच्छा.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
14 जुलै 2023 हा दिवस देशाच्या अंतराळ इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी नोंदवला जाईल. आजच्याच दिवशी आपल्या चांद्रयान 3 मिशनने यशस्वी उड्डाण घेतलं. देशवासियांच्या आशांचे आणि स्वप्नांची ही यशस्वी झेप आहे.
ही बातमी वाचा: