ISRO Lunar Mission Chandrayaan-3 : इस्रो (ISRO) नव्या अवकाश भरारीसाठी सज्ज झालं आहे. आज श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-3 (Chandrayaan-3) प्रक्षेपित केलं जाणार आहे. इस्रोच्या बाहुबली रॉकेट (Bahubali Rocket) द्वारे चांद्रयान-3 लाँच करण्यात येणार आहे. लाँच व्हेईकल मार्क-III (LVM-3) म्हणजेच 'बाहुबली रॉकेट' (Bahubali Rocket) मिशन चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. एलव्हीएम-3 रॉकेटचं हे सातवं उड्डाण असेल. LVM-3 रॉकेटच्या यशस्वी उड्डाणाचा दर 100 टक्के आहे. LVM-3 भारतातील सर्वात वजनदार रॉकेट आहे, यामुळेच याला बाहुबली रॉकेट असंही म्हटलं जातं. LVM-3 रॉकेटने यापूर्वीच्या सहा मोहिमा यशस्वीरित्या राबवल्या आहेत.


'बाहुबली रॉकेट' द्वारे चांद्रयान-3 चं प्रक्षेपण


आज भारताच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पान लिहिलं जाणार आहे. अवकाशाच्या जगात आणखी एक पाऊल टाकणार आहे. चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यात चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज दुपारी 2.35 वाजता चांद्रयान 3 प्रक्षेपित केलं जाईल. मिशन चांद्रयान-3 चं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. यामुळे चांद्रयान-3 सोबतच इस्रोच्या 'बाहुबली रॉकेट'ची चर्चा आहे  इस्रोच्या 'बाहुबली रॉकेट' म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 प्रक्षेपित केलं जाईल. बाहुबली रॉकेटची उंची 43.5 मीटर आणि वजन 6.4 लाख किलो आहे. LVM-3 रॉकेटने सहा अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. कसं आहे LVM-3 जाणून घ्या.


प्रक्षेपणात 100 टक्के यश


बाहुबली रॉकेट म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क-III (LVM-III) चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. हे भारतातील सर्वात वजनदार रॉकेट आहे. या रॉकेटच्या प्रक्षेपणाच्या यशाचा दर 100 टक्के आहे. बुधवारी सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये चांद्रयान 3 असलेले एन्कॅप्स्युलेटेड असेंबली LVM 3 शी जोडण्यात आलं. LVM-3 रॉकेटचं वजन 642 टन असून याचं वजन सुमारे जवळपास 130 हत्तींच्या वजनाएवढं आहे. लाँच व्हेईकल मार्क-III ची उंची 43.5 मीटर असून ही कुतुबमिनार (72 मीटर) च्या निम्म्याहून अधिक आहे.


भारताचं सर्वात शक्तिशाली रॉकेट


लाँच व्हेईकल मार्क-3 (LVM-III) हे भारताचं सर्वात शक्तिशाली रॉकेट आणि सर्वात वजनदार रॉकेट आहे. हे प्रक्षेपण वाहन म्हणजेच प्रक्षेपण वाहन 10 टन उपग्रहाला पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत घेऊन जाऊ शकतं. यामध्ये दोन इंजिन असून एक द्रव इंधन इंजिन आणि दुसरं क्रायोजेनिक इंजिन आहे.


14 वर्षाची मेहनत


भारताचं सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM 3 तयार करण्यासाठी खूप प्रदीर्घ कालावधी आणि मेहनत लागली आहे. लाँच व्हेईकल मार्क-III तयार करण्यासाठी इस्रोला 15 वर्षे लागली. इस्रोने बनवलेले हे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. हे रॉकेट हेवी लिफ्ट लाँचसाठी वापरलं जातं. चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणासाठीही LVM-3 वापरण्यात आलं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ISRO Solar Mission : चंद्रानंतर इस्रोची सोलर मोहिम! आदित्य L-1 आणि गगनयान; ISROच्या भविष्यातील मोहिमांबाबत जाणून घ्या...