Chandrayaan-3 : चांद्रयान -2 च्या अपयशानंतर चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ची घोषणा झाल्यानंतर आता हे अंतराळयान प्रक्षेपण करणाच्या तयारीत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून 12 जुलै रोजी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण होणार आहे. तसेच हे चांद्रयान 23 ऑगस्टपर्यंत चंद्रावर उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हे चांद्रयान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येईल.त्यामुळे आता भारताकडून अंतराळात  मोठी कामगिरी पार पाडण्यात येणार आहे.


तयारी शेवटच्या टप्प्यात


इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3च्या प्रक्षेपणाशी संबंधित सर्व चाचण्यांचे यशस्वी परीक्षण मार्चमध्ये करण्यात आले आहे. ज्यामधून चांद्रयान-3 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे त्या सीई-20 या क्रायोजेनिक इंजिनचे देखील यशस्वीरित्या परिक्षण करण्यात आले आहे. याआधी लँडरची देखील एक प्रमुख चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली होती. चांद्रयान-3 हे भारताच्या चांद्रयान मोहिमेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. तसेच चांद्रयान -1 आणि चांद्रयान-2 नंतरच्या मोहिमेचा हा तिसरा टप्पा असून  चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवून त्याची चाचणी करण्यात येईल. यामध्ये एक ऑर्बिटर, एक लँडर आणि एक रोवर यांचा समावेश असणार आहे. 


अशी झाली इस्रोची तयारी


इस्रोच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण करणं हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश आहे. त्यामुळे यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये नवीन उपकरणांची निर्मिती यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. 2019 मध्ये चांद्रयान-2 अयशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी आणखी एक प्रयत्न करण्यास सांगितले. त्यांनंतर चांद्रयान-2 मध्ये ज्या त्रुटी होत्या त्यांवर काम करण्यास सुरुवात झाली. त्या त्रुटी काढून नवीन यान तयार करण्यात आलं. तसेच आता हे यान प्रक्षेपण करण्याच्या दृष्टीने तयार देखील झाले आहे. 


चांद्रयान-3 हे  चांद्रयान-2 पेक्षा थोडं वेगळं असणार असल्याचं सांगितलं जात आहे.  कारण चांद्रयान-2 हे चंद्राच्या भोवती फिरणारं यान म्हणून तयार करण्यात आलं होतं. यामध्ये एका लँडरचा समावेश होता जे चंद्राच्या भूमीवर उतरेल आणि एक रोवर म्हणजे त्यातून एक छोटी गाडी बाहेर येणार होती. चांद्रयान-3 मध्ये फक्त नवीन लँडर आणि रोवरचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये ऑर्बिटर हे चांद्रयान-2 मधीलच वापरण्यात आले आहे. यामध्ये नासाच्या देखील एका प्रयोगाचा समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ISRO: आता भारत जगावर लक्ष ठेवणार! इस्रोतर्फे नॅविगेशन सॅटेलाईटचं लाँचिंग, श्रीहरीकोटामधील अंतराळ केंद्रावरून उपग्रहाचं प्रक्षेपण