नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान थोड्याच वेळात 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जाणार आहे. हे ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी 60 विद्यार्थ्यांसोबत बंगळुरुमधील इस्त्रोच्या सेंटरमध्ये दाखळ झाले आहेत. यामध्ये बारामतीच्या सिद्धी पवार या विद्यार्थीनीचाही समावेश आहे.


इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 हे 22 जुलै रोजी अवकाशात झेपावलं होतं. चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम आहे. याआधी भारताने 2008 मध्ये चांद्रयान 1 चं प्रक्षेपण केलं होतं.

चांद्रयान-2 सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर चंद्रावर उतरत आहे. चंद्रावर उतरण्यासाठी चांद्रयान 2 ला जवळपास 55 दिवस लागले. चांद्रयान चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरणार आहे. यानंतर वैज्ञानिकांना चंद्राच्या अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे.

चांद्रयान-2 च्या निमित्ताने 11 वर्षांनी इस्रो पुन्हा एकदा चंद्रावर तिरंगा फडकावणार आहे. थोड्याच वेळात चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठऱणार आहे. चंद्राच्या या भागात उतरण्याचं धाडस अद्याप कोणत्याही देशाने केलेलं नाही.

संपूर्ण चांद्रमोहीम लाईव्ह पाहा



Chandrayaan 2 | भारताची ऐतिहासिक भरारी, 'चांद्रयान-2'चं प्रक्षेपण

चांद्रयान-2 मोहिमेतील महत्वाच्या बाबी?

- पृथ्वीपासून 181.6 किमी अंतरावर गेल्यावर चांद्रयान-2 प्रक्षेपकापासून वेगळं झालं.
- यानंतर 23 दिवस चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत राहिल.
- 30 ते 42 दिवसात चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल.
- 48 व्या दिवशी विक्रम हे लॅण्डर आणि प्रग्यान हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल
- चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीननंतर जगातील चौथा देश बनेल, तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल.
- 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर सॉफ्ट लॅण्डिंग होईल.

चांद्रयान 2 चे तीन भाग
चांद्रयान 2 ला तीन भागात विभागण्यात आलं आहे. पहिला भाग ऑर्बिटर आहे, जो चंद्राच्या कक्षेत राहिल. दुसरा भाग लॅण्डर ज्याचं नाव आहे विक्रम, ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. तर तिसरा भाग आहे प्रग्यान जो रोव्हर असून तो चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत राहिल.

पहिलं प्रक्षेपण स्थगित

गेल्या सोमवारी म्हणजे 15 जुलैला चांद्रयान 2 लॉन्चिंग स्थगित झालं होतं. तांत्रिक कारणांमुळे लाँचिंग काऊंटडाऊनच्या जवळपास 56 मिनिट आधीच मोहीम स्थगित करण्यात आली होती. भारतच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं होतं. वेहिकल सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून चांद्रयान-2 चं लॉन्चिंग थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं इस्रोने घेतला होता. त्यानंतर 22 जुलै रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी चांद्रयान 2 चं लॉन्चिंग झालं होतं.

Chandrayan-2 | चांद्रयान- 2 ने पाठवलेल्या दुसऱ्या फोटोत दिसले चंद्रावरील खड्डे


चांद्रयान 2 मोहिमेची वैशिष्ट्ये काय?

चांद्रयान तब्बल 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतर पार करुन चंद्रावर पोहोचणार

चंद्रावर पोहचण्यासाठी चांद्रयान 2 ला 55 दिवसांचा कालावधी लागणार

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर प्रज्ञान उतरेल

चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान चंद्रावरची माहिती कंट्रोल सेंटरला पाठणार

चांद्रयान 2 मोहिमेतील अडचणी आणि आव्हान

अंतराळात चंद्राच्या गतीबरोबरच चांद्रयान 2 च्या गतीवर नियंत्रण ठेवणे

चांद्रयान 2 पृथ्वीपासून 3 लाख किमीच्या अंतरावर असल्याने त्याच्याशी संपर्क कायम ठेवणे

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर रोवर आणि लँडर विक्रम उतरवणे

चंद्रावरच्या तापमानासह धुळीचाही मोहिमेवर परिणाम होऊ शकतो

हे ही वाचा -चांद्रयान 2 मोहीमेचा खडतर पण अनोखा प्रवास!