एक्स्प्लोर

Chandrayaan 2 | संपूर्ण देश इस्रोच्या पाठीशी : पंतप्रधान मोदी

अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटर जवळ जाऊन थांबली. चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला. पण अजूनही संपर्क होण्याची आशा कायम आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून डेटा विश्लेषणाचं काम सुरु आहे.

बंगळुरु : "मी तुमची मनस्थिती जाणतो, पण निराश होऊ नका, देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान 2 मोहीमेशी संबंधित प्रत्येकाला धीर दिला. बंगळुरुमधील इस्रोच्या कंट्रोल सेंटरमध्ये पंतप्रधान मोदींना चांद्रयान 2 मोहीमेत आलेल्या अडचणीबद्दल देशाला संबोधित केलं. लॅण्डर विक्रमशी संपर्क तुटला अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटर जवळ जाऊन थांबली. चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला. पण अजूनही संपर्क होण्याची आशा कायम आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून डेटा विश्लेषणाचं काम सुरु आहे. दरम्यान अद्याप भारताची ही मोहीम अयशस्वी ठरलेली नाही. लॅण्डरशी जरी संपर्क तुटला असला तरी ऑर्बिटरद्वारे मोहीमेचा बराचसा भाग पूर्ण करता येणार आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. इस्रो प्रमुख रडले, पंतप्रधानही भावुक  पंतप्रधान मोदींना त्यांच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी गेलेल्या इस्रो प्रमुखांना आपलं दु:ख लपवणं कठीण झालं आणि ते रडू लागले. यानंतर पंतप्रधानांनी त्यांची गळभेट घेऊन पाठ थोपटली आणि धीर दिला. पंतप्रधान गाडीत बसले आणि के सिवन यांनी त्यांना निरोप दिला.  परंतु सिवन यांचे डबडबलेले डोळे आणि चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. तर पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरही काहीसे निराशेचे भाव होते. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, रात्रंदिवस काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं कौतुक :  पंतप्रधान मोदी या मोहीमेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती वेगळ्या मनस्थितीत आहे, अनेक प्रश्न होते, मोठ्या यशासोबत पुढे जात होता. अचानक काहीही दिसेनासं झालं, मी देखील तो क्षण तुमच्यासोबत जगलो :  पंतप्रधान मोदी चंद्राला कवेत घेण्याची आपली इच्छाशक्ती आणि इरादा आणखी दृढ झाला आहे : पंतप्रधान मोदी देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कुणी विसरु शकणार नाही : पंतप्रधान मोदी तुम्ही लोण्यावर रेघ मारणारे नाही तर दगडावर रेघ लोक आहात :  पंतप्रधान मोदी मी आधीही सांगितलंय, आताही सांगतो, मी तुमच्यासोबत आहे, देश तुमच्यासोबत आहे :  पंतप्रधान मोदी चांद्रयान 2 चा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता :  पंतप्रधान मोदी चांद्रयान 2 चा प्रवास शानदार, अनेक अडचणींतून यश मिळालं : पंतप्रधान मोदी विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही : पंतप्रधान मोदी अंतराळ क्षेत्रात भारत अग्रणी आहे, यासाठी वैज्ञानिकांचं अतुलनीय योगदान : पंतप्रधान मोदी आपल्याला यश नक्कीच मिळणार, या मोहीमेच्या पुढच्या प्रयत्नातही आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नान यश आपल्यासोबत असेल  :  पंतप्रधान मोदी चांगल्या कामासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न एक नवीन धडा शिकवतो, चांद्रयानाच्या माध्यमातूनही आपल्याला खूप शिकायला मिळालं : पंतप्रधान मोदी लवकरच आपल्या हाती चांगला निकाल येईल, आपला इतिहास उज्वल आहे, हार मानण्याची आपली संस्कृती नाही : पंतप्रधान मोदी निकाल आपल्या जागी, पण मला आणि संपूर्ण देशाला आपल्या वैज्ञानिक, इंजिनिअरच्या प्रयत्नांचा अभिमान आहे :  पंतप्रधान मोदी

महत्त्वाच्या बातम्या

जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Embed widget