एक्स्प्लोर

चंद्राबाबूंचा उद्धव ठाकरेंना फोन, एनडीए सोडण्यावर चर्चा?

या दोन्ही नेत्यांमध्ये एनडीएची साथ सोडण्याबाबत काही महत्त्वाची चर्चा झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये एनडीएची साथ सोडण्याबाबत काही महत्त्वाची चर्चा झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना चंद्राबाबू नायडू यांना एनडीएत जितकं महत्त्व दिलं जात होतं, तेवढं महत्त्व दिलं जात नसल्याने ते सध्या नाराज आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एनडीची साथ सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच, या अर्थसंकल्पातही आंध्र प्रदेशकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही, अशी त्यांची भावना आहे. उद्धव ठाकरेंनीही काही दिवसांपूर्वी यापुढे स्वबळावर निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं होतं. शिवाय राज्यात असो किंवा केंद्रात, प्रत्येक मुद्द्यावर भाजप, विशेषत: मोदी आणि अमित शाहांना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून लक्ष्य केलं जातं. उद्धव ठाकरेंची ही नाराजी ओळखूनच चंद्राबाबूंनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपवर नाराज असलेले हे दोन्ही पक्ष एनडीएची साथ सोडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीडीपी आणि चंद्राबाबूंचं महत्त्व चंद्राबाबू नायडू हे तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात एनडीएच्या स्थापनेपासून टीडीपी एनडीएत आहे. 2014 साली त्यांनी भाजपसोबत निवडणूक लढवत विभाजीत आंध्र प्रदेशमध्ये एकहाती सत्ता मिळवली. ते 1994 ते 2004 असं सलग दहा वर्षे संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2004 ते 2014 या काळात त्यांच्याकडे आंध्र प्रदेश विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी होती. 2014 साली सत्ता मिळवत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. टीडीपी हा दक्षिण भारतातील महत्त्वाचा पक्ष आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत सध्या 175 पैकी 125 जागा टीडीपीकडे आहेत, तर भाजपच्या केवळ 4 जागा आहेत. विरोधी पक्षात असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या 46 जागा आहेत. टीडीपीची एकहाती सत्ता असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये भाजपसाठी चंद्राबाबूंची नाराजी हा मोठा धक्का आहे. कारण, 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशच्या 25 लोकसभेच्या जागांपैकी 17 जागांवर टीडीपीने विजय मिळवला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget