एक्स्प्लोर

चंदीगड छेडछाड : पाच ठिकाणांचं सीसीटीव्ही फुटेज गायब

हरियाणामध्ये एका आयएएस अधिकारी विरेंदर कुंडू यांची मुलगी वर्णिकाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर विकासवर छेडछाडीचा आरोप केला आहे.

चंदीगड : हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीचा पाठलाग आणि छेडछाड प्रकरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपवर टीकेचा भडिमार केला आहे. कारण हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर पाठलाग आणि छेडछाड केल्याचा आरोप आहे. महत्त्वाचं म्हणजे या गंभीर गुन्ह्यातही त्याला सहजरित्या जामीन मिळाला आहे. हरियाणा भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकासला छेडछाडीच्या आरोपात अटक करण्यात आली होती. पण अटकेनंतर त्याची जामीनावर सुटका झाल्याने जोरदार विरोध होत आहे. विरोधक आरोपींविरोधात कठोर कारवाईसह सुभाष बराला यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? हरियाणामध्ये एका आयएएस अधिकारी विरेंदर कुंडू यांची मुलगी वर्णिकाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर विकासवर छेडछाडीचा आरोप केला आहे. तरुणीच्या आरोपानुसार, विकास बराला आणि त्याचा मित्र आशिष कुमार एका पेट्रोल पंपापासूनच तिच्या कारचा पाठलाग करत होते आणि कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रसंगावधान दाखवत पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोहोचलेल्या दोन जणांना अटक केली. यानंतर तरुणीने फेसबुकवर पोस्ट लिहिली. मी सुदैवी आहे की बलात्कारानंतर मी नाल्यात सापडले नाही," असं तिने लिहिलं आहे. सीसीटीव्ही फुटेज गायब, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न? दरम्यान या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ज्या परिसरात छेडछाड झाली होती, त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेजही बेपत्ता आहे. सेक्टर 26 आणि सेक्टर 7 मधील पाच ठिकाणांचे फुटेज गायब आहे. त्यामुळे पोलिस आरोपीला वाचवत असल्याचा आरोप होत आहे. विकास बरालावर लागलेलं कलम 365 आणि 511 वर कायदेशीर सल्ला हरियाणा पोलिस घेणार आहेत. गरज पडल्यास विकासला पुन्हा अटक होऊ शकते. आरोपींना ज्यूस आणि कॉफी दिल्याचाही आरोप पोलिसांनी करण्यात येत आहे. विरोधकांची भाजपवर सडकून टीका चंदीगडची घटना केवळ छेडछाड नाही तर अपहरणाचा प्रयत्न असल्याचं सांगत आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "चंडीगडमध्ये तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न आणि छेडछाडीच्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. भाजप सरकारने गुन्हेगार आणि त्यांच्या गलिच्छ मानसिकतेचा साथ देऊ नये, त्यांना शिक्षा द्यायला हवी, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. https://twitter.com/OfficeOfRG/status/894214011704664064 या प्रकरणावरुन काँग्रेस कार्यकर्ते राज्यभर ठिकठिकाणी भाजपचा निषेध करत आहे. तर रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी या घटनेच्या निषेधार्थ भाजप सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. वर्णिका कुंडूची फेसबुक पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget