Chandigarh Mayor Election: भाजपनं चंदीगढ महापौर निवडणुकीत अवघ्या एका मताने बाजी मारली आहे. भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्या नेतृत्वात भाजपनं मिशन चंदीगढ दुसऱ्यांदा यशस्वी केलं आहे. भाजपनं आम आदमी पार्टीचा अवघ्या एका मताने पराभव केला. पंजाबमध्ये सत्तेत असणारी आम आदमी पार्टी विरोधात असल्यामुळे भाजपसाठी ही लढाई सोपी नव्हती. पण विनोद तावडेंच्या रणनिती आणि काँग्रेसच्या सहा नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे भाजपचा एका मताने विजय झाला आहे. आता दिल्लीत काय होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 


चंदीगढ महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 15 मतं आली तर आप पक्षाला 14 मतांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी ऐनवेळी सभागृहात दांडी मारली, त्यांची अनुपस्थिती भाजपच्या पथ्यावर पडली आहे. भाजपच्या अनूप गुप्ता यांनी  आम आदमी पार्टीच्या जसबीर सिंह यांचा अवघ्या एका मताने पराभव केला.  भाजपचे अनूप गुप्ता चंदीगढ महानगरपालिकेचे नवीन महापौर झाले आहेत. 


सहा नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसनं आणि एक सदस्य असणाऱ्या शिरोमणी अकाली दलाने महापौरपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजप आणि आप यांच्यातील निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज होता. त्याप्रमाणे या दोन्ही पक्षामध्ये काटें की टक्कर झाली. यामध्ये भाजपनं एका मताने आप पक्षाचा पराभव केला. भाजपच्या विजयात महासचिव विनोद तावडे यांचा मोठा वाटा होता. पण आता तावडे यांच्यासमोर दिल्ली महानगर पालिकेतील मोठं आव्हान असणार आहे. महापौरच्या निवडणुकीत विनोद तावडे काही करिश्मा करणार का? याची उत्सुकता शिगेला लागली आहे.  






चंदीगढमधील विजयानंतर भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी ट्वीट केलं. ते म्हणाले की, चंदीगढचे महापौर, वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर या तिन्ही जागांवर भाजपनं विजय मिळाला आहे. जनता आणि नगरसेवकांच्या विश्वासामुळे हा विजय मिळाला आहे. अनूप गुप्ता, मेयर कंवर राणा आणि  हरजीत सिंह या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन!






आणखी वाचा - 


Ahmadnagar Latest News : शेकडो गरोदर ऊसतोड महिलांच्या हातातही कोयता, सुविधांपासून वंचित! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल