एक्स्प्लोर

देशातील सर्व प्ले स्कूलची मान्यता धोक्यात

नवी दिल्ली: देशातील सर्व प्ले स्कूलची मान्यता धोक्यात असून, केंद्र सरकार यासाठी नवी नियमावली तयार केली आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (NCPCR)ने यासंबंधी मंगळवारी नवी नियामावली जाहीर केली. यामध्ये प्ले स्कूलमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे वय तीन वर्षांहून जास्त असणे गरजेचे असल्याचे म्हणले आहे. तसेच एखाद्या प्ले स्कूलने तीन वर्षाखालील मुलाला प्रवेश दिला, तर त्याची मान्यता तत्काऴ रद्द करण्यात येणार आहे. सध्या देशात लाखोंच्या संख्येने प्ले स्कूल कार्यरत असून, यामध्ये दोन ते अडीच वर्षाखालील मुलांना प्रवेश दिला जात आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने यासंबंधी एनसीपीसीआरला 2015 मध्ये नवी नियमावली तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, एनसीपीसीआरने विविध संस्था तज्ज्ञांशी चर्चा करुन ही नियमावली तयार केली आहे. एनसीपीसीआरने ही नियमावली केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयासोबतच सर्व राज्याच्या बाल विकास मंत्रालयांना, निप्सेड, आणि केंद्रशासित प्रदेशांनाही पाठवली आहे. देशातील प्ले स्कूल संदर्भात कोणतीही नियमावली  अस्तित्वात नसल्याने, देशातील विविध भागांमध्ये प्ले स्कूलचे पेव फुटले आहे. पण आता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या नियमावलीमुळे मुलांच्या प्रवेश प्रक्रियेवर चाप बसणार आहे. तसेच अवैध प्ले स्कूल चालवण्यावरही आळा बसणार असल्याचा विश्वास आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त् केला आहे. विशेष म्हणजे, आयोगाने प्ले स्कूलच्या हलचालींवर लक्, ठेवण्याची जबाबदारी सर्व राज्यातील जिल्हा अंगणवाडीच्या आयसीडीसीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच एनसीपीसीआरने आपल्या नव्या नियमावलीत प्ले स्कूल सुरु करण्यासाठीचा अर्ज आणि इतर आवश्यक साहित्य संबंधित संघटनांकडे पाठवली आहे. आता याची अंमलबजावणीचे अधिकारही राज्याकडे देण्यात आले आहेत. याशिवाय आयोगाने आपल्या नव्या नियमावलीत प्ले स्कूलसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कॉर्पोरेशन अॅन्ड चाईल्ड डेव्हलपमेंट (NIPCCD)ने तयार केलेला अभ्यासक्रम शिकवणे प्ले स्कूलना बंधनकारक केले आहे. तसेच प्ले स्कूलमधील सर्व कर्मचारी, शिक्षकांचे पोलिसांकडून पडताळणी करणे, प्ले स्कूलमध्ये सीसीटीव्ही बसवणे, मुलांचा हेल्थ रेकॉर्ड बनवणे आदी बंधनकारक केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्ले स्कूलमधील सर्व मुलांची नावे आधारशी लिंक करणेही या नियमावली सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Embed widget