एक्स्प्लोर

हिंदू कि मुस्लीम जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याक कोण? : सुप्रीम कोर्ट

  नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याक कुणाला म्हणावं, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विचारला असून, यावर चार आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दोघांना दिले आहेत. यावर केंद्र आणि राज्य सरकारनेही सहमती दर्शवली आहे. गेल्या वर्षी अंकुर शर्मा नावाच्या व्यक्तीने याबाबत सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या माध्यमातून शर्मा यांनी राज्यातील अल्पसंख्याक कोण याबाबत नियमावली नसल्याची तक्रार केली होती. राज्यात अल्पसंख्याक किती आहेत, हे निश्चित करण्यासाठी कोणताही कायदा नाही. त्यामुळे अल्पसंख्याकांसाठी पंतप्रधानांनी राबविलेल्या 15 सूत्री योजनांचा लाभ मुस्लीम समाजातील व्यक्ती उचलत असल्याचे या याचिकेत म्हणलं होतं. तसेच राज्यात मुस्लीमांच्या तुलनेत हिंदू, शीख आणि बौद्ध समाजाची लोकसंख्या कमी असल्याने त्यांना या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, अशीही मागणी याद्वारे केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तर मागवलं असून, कोर्टासमोर दोन्ही सरकारच्या वकिलांनी यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचं मान्य केलं. केंद्र सरकारचे वकील म्हणून अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी काम पाहिले. न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडताना तुषार मेहता म्हणाले की, प्रत्येक राज्यातील लोकसंख्या आणि इतर परिस्थीती लक्षात घेऊन अल्पसंख्याकांची निश्चिती केली पाहिजे. जिथे ही झालेली नाही, तिथे करणे गरजेचं आहे. तर राज्य सरकारचे वकील गोपाल सुब्रमण्यम यांनीही सरकार याप्रकरणावर तोडगा काढण्यास राज्य सरकार तयार असल्याचं सांगितलं. यासाठी केंद्र सरकारसोबत बैठक होणार असून, केंद्राने यासाठी सहमती दर्शवली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या पुढाकाराबद्दल मुख्य न्यायमूर्ती जे.एस.खेहर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसेच यावर चार आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

PoK Protest : ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
मोबाईल उत्पादनात भारत देणार चीनला टक्कर!  62 हजार 500 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी, 60 हजार रोजगारांची निर्माण होणार 
मोबाईल उत्पादनात भारत देणार चीनला टक्कर!  62 हजार 500 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी, 60 हजार रोजगारांची निर्माण होणार 

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget