7th Pay Comission DA Hike:  अनेक राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ केल्यानंतर अनेक राज्यांत देखील वाढ करण्यात आली आहे. जुलै 2021 मध्ये दीर्घ कालावधीनंतर केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन 28 टक्के केला होता. यानंतर, ऑक्टोबर 2021 मध्ये, आणखी 3 टक्के वाढ देऊन तो 31 टक्के करण्यात आला. मग सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्यात आला आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात 38 टक्क्यावरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 


महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवला जातो. सरकार काही परिस्थितींमध्ये हा भत्ता वाढवणं टाळू देखील शकतं. महागाई भत्ता हा सहा महिने आधी लागू केला जातो. म्हणजेच पहिल्या  महगाई भत्त्यातील वाढ ही जानेवारीत होते तर दुसऱ्या भत्त्यातील वाढ ही जुलैमध्ये होते. जानेवारीमध्ये महगाई भत्त्यात वाढ ही उत्तर प्रदेश, तमिळनाडू, आसाम आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये करण्यात आली होती. 


तमिळनाडूमध्ये किती वाढ झाली


तमिळनाडूच्या राज्यसरकारने महागाई भत्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच आता तमिळनाडूनत महागाई भत्ता हा 38 टक्क्यावरुन 42 टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे सोळा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे. हे नवे दर एक एप्रिलपासून लागू होतील. 


उत्तर प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ


उत्तर प्रदेशातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात देखील वाढ करण्यात आली आहे. इथे देखील 42 टक्क्यापर्यंत महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशात 16.35 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 11 लाथ पेन्शनधारकांना लाभ होणार आहे. 


बिहारमध्ये देखील वाढला महागाई भत्ता


बिहारच्या राज्यसरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा चार टक्के महागाई भत्ता बिहारमध्ये वाढवण्यात आला आहे. पेन्शन धारकांना देखील याचा लाभ मिळणार आहे. 


हिमाचल, आसाम आणि राजस्थानमध्ये देखील वाढला महागाई भत्ता 


हिमाचल प्रदेशात महागाई भत्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर राजस्थानमध्ये चार टक्क्यांनी महागाई भत्यात वाढ करण्यात आली आहे. तर आसामध्ये चार टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mhada Lottery 2023 Mumbai : मुंबईत घराचे स्वप्न साकार होणार! दादर, वडाळा, गोरेगावमधील घरांच्या सोडतीसाठी 22 मे पासून अर्ज भरा