एक्स्प्लोर

दहशतवादाविरोधात केंद्र सरकारची मोठी कारवाई, 18 दहशतवाद्यांची यादी जारी

केंद्र सरकारने 18 जणांना युएपीए कायद्यांर्तग दहशतवादी घोषित केले आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन आणि इंडियन मुजाहिद्दीनचे भटकळ बंधू यांचा देखील समावेश आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एखाद्या व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या तरतूदीचा समावेश करण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये अवैध कृत्ये (प्रतिबंध) कायदा 1967 मध्ये दुरुस्ती केली होती. या दुरुस्तीपूर्वी केवळ संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले जात होते. या सुधारित तरतुदीनुसार केंद्र सरकारने सप्टेंबर, 2019 मध्ये चार आणि जुलै 2020 मध्ये नऊ जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले.

राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या आणि दहशतवाद अजिबात खपवून न घेण्याच्या धोरणाप्रती वचनबद्धता अधिक मजबूत करत केंद्र सरकारने आज 18 व्यक्तींना युएपीए कायदा 1967 च्या (2019 मध्ये सुधारित) तरतुदीनुसार दहशतवादी म्हणून घोषित केले आणि त्यांची नावे या कायद्या सूचीत समाविष्ट केली. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन आणि इंडियन मुजाहिद्दीनचे भटकळ बंधू यांचा देखील समावेश आहे.

1. साजिद मीर उर्फ साजिद मजीद उर्फ इब्राहिम शाह उर्फ वसी उर्फ खली उर्फ मुहम्मद वसीम पाकिस्तान स्थित वरिष्ठ एलईटी कमांडर आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना आखणाऱ्यांपैकी एक होता.

2. युसुफ मुझम्मिल उर्फ अहमद भाई उर्फ युसूफ मुझम्मिल बट उर्फ हुरेरा भाई जम्मू-काश्मीरमधील एलईटी कारवायांचा पाकिस्तान स्थित कमांडर आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी.

3. अब्दुर रहमान मक्की उर्फ अब्दुल रहमान मक्की हाफिज सईद याचा मेव्हणा, एलईटीचा प्रमुख आणि एलईटी राजकीय प्रकरणांचा प्रमुख आणि एलईटीचा परराष्ट्र संबंध विभाग प्रमुख होता.

4. शाहिद मेहमूद उर्फ शाहिद मेहमूद रेहमतुल्ला पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या फलाह-ए-लन्झनियात फाउंडेशन (एफआयएफ). या अग्रणी संघटनेचा उपप्रमुख.

5. फरहतुल्लाह घोरी उर्फ अबू सुफियान उर्फ सरदार साहब उर्फ फारू पाकिस्तान स्थित दहशतवादी आणि अक्षरधाम मंदिर (2002) हल्ला आणि हैदराबादमधील टास्क फोर्स कार्यालयावर आत्मघाती हल्ला (2005).यात सहभाग

6. अब्दुल रौफ असगर उर्फ मुफ्ती उर्फ मुफ्ती असगर उर्फ साद बाबा उर्फ मौलाना मुफ्ती रौफ असगर नवी दिल्लीतील 2001 मध्ये संसद भवनवरील दहशतवादी हल्ल्याचे षडयंत्र रचण्यात आणि लष्करी प्रशिक्षण आणि पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण शिबिरांची उभारणी करण्यात सहभागी पाकिस्तान स्थित दहशतवादी.

7. इब्राहिम अथार उर्फ अहमद अलीमोहद अली शेख उर्फ जावेदअमजाद सिद्दीकी उर्फ ए.ए. शेख उर्फ चीफ 24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सचे विमान क्रमांक एलसी -814 च्या अपहरणात कंदहार अपहरण प्रकरणात सामील असलेला पाकिस्तान स्थित दहशतवादी आणि भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार

8. युसूफ अझहर उर्फ अझर यूसुफ उर्फ मोहम्मद सलीम 24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सचे उड्डाण क्रमांक एलसी -814 च्या अपहरणात (कंदहार अपहरण प्रकरण) सामील असलेला पाकिस्तान स्थित दहशतवादी

9. शाहिद लतीफ उर्फ छोटा शाहिद भाई उर्फ नूर अल दिन पाकिस्तानमधील दहशतवादी आणि सियालकोट क्षेत्राचा जैश-ए -मोहम्मदाचा कमांडर , जेईएम दहशतवाद्यांना भारतात आणण्यात सहभाग . भारतातील दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन, सेवा पुरवणे, आणि अंमलबजावणीमध्ये देखील सहभागी होता.

10. सय्यद मोहम्मद युसुफ शहा उर्फ सय्यद सलाहुदीन उर्फ पीर साहब उर्फ बुजर्ग पाकिस्तान आधारित, हिज्ब-उल-मुजाहिद्दीनचा सर्वोच्च कमांडर आणि युनायटेड जिहाद काउन्सिलचा अध्यक्ष (यूजेसी) एचएम कॅडरद्वारे दहशतवादी कारवायांना चालना देण्यासाठी भारतात निधी उभारणी आणि वित्तपुरवठा करण्यात सहभागी.

11. गुलाम नबी खान उर्फ अमीर खान उर्फ सैफुल्ला खालिद उर्फ खालिद सैफुल्ला उर्फ जवाद उर्फ दांड पाकिस्तान स्थित हिजबुल मुजाहिद्दीनचा उप-प्रमुख (एचएम).

12. झाफर हुसेन भट उर्फ खुर्शीद उर्फ मोहम्मद जफर खान उर्फ मौलवी उर्फ खुर्शीद इब्राहिम पाकिस्तान स्थित हिजबुल मुजाहिद्दीन चा उपप्रमुख, आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचे आर्थिक व्यवहारही सांभाळतो . काश्मीर खोऱ्यात एचएम कारवायांसाठी निधी पाठविण्यास जबाबदार.

13. रियाझ इस्माईल शाहबंदरी उर्फ शाह रियाझ अहमद उर्फ रियाज भटकळ उर्फ मोह रियाझ उर्फ अहमद भाई उर्फ रसूल खान उर्फ रोशन खान उर्फ अझीझ पाकिस्तान स्थित , “इंडियन मुजाहिद्दीन” या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य. जर्मन बेकरी (2010), चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू (2010), जामा मशिद (2010), शीतलाघाट (2010) आणि मुंबई (2011) सह भारतातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे.

14. मोह. इकबाल उर्फ शबंद्री मोहम्मद इक्बाल उर्फ इकबाल भटकळ पाकिस्तान स्थित , इंडियन मुजाहिद्दीन (आयएम). दहशतवादी संघटनेचा सह-संस्थापक, जयपुर बॉम्बस्फोट मालिका (2008), दिल्ली बॉम्बस्फोट मालिका (2008), अहमदाबाद आणि सुरत बॉम्बस्फोट (2008) जर्मन बेकरी ब्लास्ट, पुणे (2010) आणि चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरू स्फोट (2010) यासह दहशतवादी वित्तपुरवठा आणि विविध दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे.

15. शेख शकील उर्फ छोटा शकील

दाऊद इब्राहिमचे पाकिस्तान स्थित सहकारी, डी-कंपनीच्या सर्व गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड कारवाया पाहतो. डी-कंपनीच्या भारतातील कारवायांना वित्तपुरवठा , 1993 मध्ये गुजरात मध्ये शस्त्रास्त्र तस्करीमध्ये सामील होता.

16. मोहम्मद अनीस शेख मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण 1993 मध्ये सहभाग आणि शस्त्रे, दारुगोळा आणि हॅण्डग्रेनेडच्या पुरवठ्यास जबाबदार पाकिस्तानस्थित दहशतवादी.

17. इब्राहिम मेमन उर्फ टायगर मेमन उर्फ मुश्ताक उर्फ सिकंदर उर्फ इब्राहिम अब्दुल रझाक मेमन उर्फ मुस्तफा उर्फ इस्माईल मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात गुन्हेगारी कट रचणारा पाकिस्तान स्थित दहशतवादी.

18. जावेद चिकना उर्फ जावेद दाऊद टेलर 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सामील असलेला पाकिस्तान स्थित दाऊद इब्राहिम कासकरचा हस्तक.

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget