- पहिलं म्हणजे Resolution Corporation ची स्थापना करणं. ही संस्था ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिव्यूनल’च्या निर्णयांतर्गत दिवाळखोरीकडे वाटचाल करणाऱ्या वित्तीय संस्थांची संपत्ती एखाद्या सक्षम संस्थेकडे हस्तांतरीत करेल.
- तसेच काही आर्थिक संस्थांना Systemically Important Financial Institutions चा दर्जा दिला जाईल. कारण या संस्था दिवाळखोर झाल्यास, तर त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल.
- विशेष फंडाची स्थापना करुन, त्या माध्यमातून जमा रकमेवर विमा संरक्षण दिलं जाईल. तसेच या निधीतून इतर सर्व खर्च चुकवले जातील.
- Deposit insurance and Credit Guarantee Corporation Act, 1961 संपवणे ( विधेयकातील याच तरतुदीमुळे बँक दिवाळखोर झाल्यास, जमा रकमेवरील एक लाखापर्यंतचं विमा संरक्षण मिळणार नाही)
विरोधानंतर वादग्रस्त FDRI विधेयक बासनात गुंडाळणार?
एबीपी माझा वेब टीम | 27 Dec 2017 10:19 PM (IST)
संसदीय समितीने FDRI संदर्भातील आपला अहवाल सादर करण्यासाठी अतिरिक्त मुदत मागितल्यामुळे हे बासनात गुंडळले जाण्याचे संकेत मिळत आहेत. समितीने अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंतची मुदत मागितली आहे.
नवी दिल्ली : बँकेत जमा रकमेसंदर्भातील वादग्रस्त FDRI विधेयकाला विरोधानंतर सरकार बासनात गुंडाळण्याची शक्यता आहे. या विधेयकाअंतर्गत एक लाखापर्यंतचं विमा संरक्षण काढून घेणं, आणि ‘बेल इन’वरुन मोठा वाद निर्माण होत होता. यामुळे सरकारवर ही टीकेची झोड उठत होती. पण दुसरीकडे बँक खातेदारांची सर्व रक्कम सुरक्षित असल्याचं सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं. पण तरीही तीव्र विरोधामुळे सरकारने हे विधेयक तुर्तास बासनात गुंडाळण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हे विधेयक संसदेच्या पटलावर मांडण्यात येणार नाही. कारण, या विधेयकामुळे सत्तारुढ पक्षाविषयी जनमानसात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे या विधेयकातील विमा संरक्षणासंदर्भातील तरतुदीचा सत्तारुढ भाजपला राजकीय फटका बसेल. शिवाय, प्रस्तावित विधेयकातील ‘बेल इन’च्या तरतुदीबाबतही अनेक भ्रम पसरवले जात आहेत. यातील मुख्य म्हणजे, या विधेयकामुळे जर बँक किंवा वित्तीय संस्था दिवाळखोर झाली, तर अशा वेळी बँक खातेदारांच्या जमा रकमेचा वापर करुन, बँकेची देणी चुकवली जातील. याच कारणास्तव, सत्तारुढ भाजपमधीलच अनेक खासदार या विधेकाला विरोध करत आहेत. सध्या हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे विचाराधीन असून, समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे भूपेंद्र यादव आहेत. संसदीय समितीने आपला अहवाल सादर करण्यासाठी अतिरिक्त मुदत मागितल्यामुळे हे विधेयक बासनात गुंडाळले जाण्याचे संकेत मिळत आहेत. समितीने अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंतची मुदत मागितली आहे. त्यामुळे जर संसदीय समितीने मागितलेल्या मुदतीत अहवाल सादर झालाच, तरीही पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी हे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता कमी आहे. सूत्रांच्या मते, सत्तारुढ भाजपकडून पक्षाअंतर्गत दबाव निर्माण झाला, तर हे विधेयक पुन्हा लटकण्याची शक्यता आहे. काय आहे विधेयक? 11 ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर करण्यात आलेल्या या विधेयकाचा मुख्य उद्देश आर्थिक सेवा पुरवणाऱ्या जशा की, बँक आणि विमा कंपन्या दिवाळखोर होत असतील, तर त्यांना यापासून वाचवण्यासाठी प्रस्तावित विधेयकात तरतूद करण्यात आली आहे. वास्तविक, बँकिंग कायदा 1949, रिझर्व बँक कायदा 1934, विमा कायदा 1938, जीवन विमा कायदा 1956 आणि स्टेट बँक कायदा 1955 मध्ये दिवाळखोरीच्या वाटेवरील बँकांना वाचवण्यासंदर्भात आवश्यक त्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्जदार आणि बँक खातेदारांच्या हिंतांचं रक्षक कसं करता येईल? याबाबतची प्रक्रिया स्पष्ट देण्यात आली आहे. नव्या विधेयकाचा उद्देश