एक्स्प्लोर

तिहेरी तलाकनंतर हज यात्रेतील ‘मेहरम’ प्रथा बंद, मोदींची घोषणा

तात्काळ तिहेरी तलाकनंतर मोदी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुस्लीम महिलांना हज यात्रेसाठी बंधनकारक असलेली ‘मेहरम’ प्रथा बंद करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून केली.

नवी दिल्ली : तात्काळ तिहेरी तलाकनंतर मोदी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुस्लीम महिलांना हज यात्रेसाठी बंधनकारक असलेली ‘मेहरम’ प्रथा बंद करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जर एखादी मुस्लीम महिला हज यात्रेला जाऊ इच्छित असेल, तर तिला मेहरम (एक पुरुष संरक्षक) शिवाय जाता येत नव्हते. याबाबत अधिक माहिती घेतल्यावर मला समजलं की, ही प्रथा सुरु करण्यामागे आम्हीच लोक आहोत. या प्रथेला कोणत्याही इस्लामिक देशात मान्याताच नाही.” मोदी पुढे म्हणाले की, “अल्पसंख्याक मंत्रालयाने यावरील निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे कोणतीही मुस्लीम महिला पुरुष संरक्षकाशिवाय हज यात्रा सहज करु शकते. विशेष म्हणजे, आत्तापर्यंत 1300 महिलांनी विना मेहर हज यात्रा करण्यासाठी अर्ज केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.” काय आहे ‘मेहरम’? ‘मेहरम’ म्हणजे ज्या मुस्लीम महिलेचा विवाह झालेला नाही. ती महिला आपले वडील, सख्खा भाऊ यांच्याशिवाय हज यात्रेला जाऊ शकत नव्हती. त्यामुळे हज यात्रेसाठी मुस्लीम महिलेला ‘मेहरम’ अतिशय आवश्यक असायचा. अनेक उलेमा मुस्लीम महिलांना एकट्याने हज यात्रा करणे म्हणजे शरियतच्या विरोधी असल्याचं सांगतात. दरम्यान, हज यात्रेसंदर्भातील नियमानुसार, वयाची 45 वर्ष पूर्ण केलेल्या महिलेला विना ‘मेहरम’ हज यात्रा करता येत होती. पण आता हिच प्रथा बंद केल्याने कोणत्याही वयोगटातील मुस्लीम महिलेला हज यात्रा करता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
Kamakhya Temple Viral Video: मुलगा अन् मुलगी सोबत एकत्र दिसले, गर्दीतील लोकांचा बाटलीनं हल्ला, गुवाहाटीच्या कामाख्या मंदिर परिसरात नको तो प्रकार, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
मुलगा अन् मुलगी सोबत एकत्र दिसले, गर्दीतील लोकांचा बाटलीनं हल्ला, गुवाहाटीच्या कामाख्या मंदिर परिसरात नको तो प्रकार, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Ram Mandir Donation Case: राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा
राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
Embed widget