नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता सहा लाखांच्या पार गेली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जवळपास तीन महिने देशात लॉकडाऊन पाळलं गेलं. लॉकडाऊनच्या तीन महिन्यात सर्वच गोष्टी बंद होत्या. यामध्ये पर्यटन स्थळे, प्रसिद्ध स्मारके बंद ठेवण्यात आली होती. आता सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, यानुसार येत्या 6 जुलैपासून देशातील स्मारके संपूर्ण काळजी घेत खुली केली जाऊ शकतात. यामध्ये लाल किल्ला, ताजमहलचा समावेश आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.


प्रल्हाद सिंह पटेल यांनी म्हटलं की, सर्व स्मारकं येत्या 6 जुलै पासून खुली केली जाऊ शकतात. संपूर्ण सुरक्षेत ही स्मारकं खुली केली जाऊ शकतात. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण तयारी केली जाणार आणि त्यानुसारच निर्देश दिले जाणार आहेत. खबरदारी म्हणून काही नियम तयार केले जाणार आहेत आणि ते पर्यटकांना पाळणे अनिवार्य असणार आहे. जी स्मारक खुली केली जाणार आहेत, त्यामध्ये ताजमहलचाही समावेश आहे.





17 मार्च रोजी सांस्कृतिक मंत्रालयाने पुरातत्व विभागाला सर्व स्मारके बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर 1 जूनला लॉकडाऊनमध्ये सवलती देण्यात आल्या त्यावेळी देशातील 820 तीर्थेक्षेत्रे खुली करण्यात आली. आता 6 जुलैपासून उर्वरित स्मारकेही उघडली जातील.


Udayanraje Bhosale | लॉकडाऊन उठवा, अन्यथा लोक कायदा हातात घेतील : उदयनराजे भोसले