एक्स्प्लोर

पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राच्या हालचाली

पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. केंद्राच्या या प्रस्तावावर जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्वाचं आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे आता केंद्र सरकारला जाग आली आहे. पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. केंद्राच्या या प्रस्तावावर जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्वाचं आहे. सलग बाराव्या दिवशी दरवाढ केंद्र सरकारवर इंधन दरवाढीविरोधात टीकेची झोड उठलेली असताना, कर्नाटक निवडणुकीनंतर आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल आज 36 पैशांनी तर  डिझेल 22 पैशांनी महागलं आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे. अमरावतीतील पेट्रोलचा आजचा दर 86.98 रुपये तर डिझेल 74.33 रुपये आहे. पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास काय होईल? पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारचे विविध प्रकारचे कर आणि एक्साईज ड्युटी आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास हे सर्व कर रद्द होतील आणि जीएसटी स्लॅबमधील एकच कर यासाठी लागू होईल. जीएसटीमध्ये कराचे चार स्लॅब आहेत, ज्यामध्ये पाच टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के या स्लॅबचा समावेश आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर इंधन दर चढेच कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर मागील 12 दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. संबंधित बातम्या इंधन दरात दहाव्या दिवशी वाढ, देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे?     ... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल    पेट्रोल-डिझेलची आगेकूच, स्वत:चा विक्रम मोदींनी अनेकवेळा मोडला! 

महत्त्वाच्या बातम्या

लग्न नाकारलं अन् शिक्षण घेतलं! वडिलांनी जमीन विकून लेकीला दिल्लीला पाठवलं, संघर्षातून यशाचं शिखऱ गाठणारी 'किरण'
लग्न नाकारलं अन् शिक्षण घेतलं! वडिलांनी जमीन विकून लेकीला दिल्लीला पाठवलं, संघर्षातून यशाचं शिखऱ गाठणारी 'किरण'
Rahul Gandhi : निशा साबळेनं राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले, राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, म्हणाले...
राहुल गांधी यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, आदिवासी विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडत म्हणाले... 
देशात खरंच साखरेचा तुटवडा आहे का? सरकारनं 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय का घेतला? ISMA नं दिली महत्वाची माहिती 
देशात खरंच साखरेचा तुटवडा आहे का? सरकारनं 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय का घेतला? ISMA नं दिली महत्वाची माहिती 
दररोज 50 किलोमीटर गाडी चालवताय? वर्षभरात पेट्रोल किंवा CNG साठी किती पैसे खर्च होतात? जाणून घ्या इंधनाचं गणित?  
दररोज 50 किलोमीटर गाडी चालवताय? वर्षभरात पेट्रोल किंवा CNG साठी किती पैसे खर्च होतात? जाणून घ्या इंधनाचं गणित?  

व्हिडीओ

Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Ritu Tawde Mumbai Mayor: महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
Embed widget